उस्मानाबाद : शहरातील शासकीय रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकार्याला लातूर येथील दोघांनी धमकी दिल्याची घटना 30 मे रोजी घडली आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, लातूर येथील सुलक्षण सुदाम शिंदे व माउली नावाच्या व्यक्तीने तुळजापूर येथे नवीन रक्तपेढी स्थापन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास मंजुरी घेण्यासाठी दि. 30 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथे त्यांनी डॉ- अश्विनी किसनराव गोरे यांना प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत धमकावले. या दोघांनी गोरे यांच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. या प्रकरणी डॉ. अश्विनी गोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.