25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeउस्मानाबादचेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवे संदर्भात रोहकल येथे पहिली अधिग्रहण परिषद

चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवे संदर्भात रोहकल येथे पहिली अधिग्रहण परिषद

एकमत ऑनलाईन

परंडा : चेन्नई ते सुरत ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस हायवे हा महाराष्ट्रातून गेलेला असल्यामुळे सदरील हायवेच्या संदर्भाने शेतक-यांच्या जमिनी आधिग्रहीत होणार आहेत. या संदर्भात शासनाने शेतक-यांना मिळणारा मावेजा दर निश्चीत न केल्यामुळे अधिग्रहणबाबत शेतक-यांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्येवर पहिली चेन्नई-सुरत ग्रीन फिल्ड हायवे अधिग्रहण परिषद तसेच लाक्षणीक उपोषण परंडा तालुक्यातील रोहकल येथे ८ ऑगस्ट रोजी रोहकलेश्वर मंदीर समोर आयोजीत केले आहे. यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग शेतकरी फेडरेशन ऑफ इंडीयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले.

महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी चेन्नई-सुरत ग्रीनफील्ड हायवे हा देशाच्या महत्त्वाच्या सहा राज्यातून जातो. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून १२७१ किलोमीटरचा बहुचर्चित हायवे हा देशातील दुस-या क्रमांकाचा ग्रीनफिल्ड हायवे आहे. यासाठी आयोजित केलेल्या परिषदेत चेन्नई-सुरत हायवेमध्ये जार्णा­या शेतीस खूपच कमी मावेजा मिळणार असून त्यातील प्रमुख अडचणी म्हणजे चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेमध्ये जाणा-या शेतक-याच्या जमिनींचे प्रामुख्याने विचार केला असता मागील तीन वर्षांमध्ये शेतक-यांनी रेडी रेकनर प्रमाणे खरेदी केलेली असल्यामुळे त्या गावांमध्ये आऊट ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेल्या खरेदी खताची नोंद कुठेही रेकॉर्डवर येणार नाही. त्यामुळे रेडी रेकनरच्या किंवा मागील तीन वर्षात जास्तीत जास्त किमतीने नोंदवलेल्या दस्ताच्या किमतीला चार पटीने शेतक-याला मावेजा मिळणार आहे.

सरासरी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि अहमदनगरच्या काही भागाचा विचार केला असता ९९ टक्के रस्ता ग्रामीण भागातून जात असल्यामुळे शेतर्क­यांनी बहुतांश वेळी खरेदी खताचे व्यवहार हे रेडी रेकनरच्या अधीन राहून केलेले आहेत. त्यामुळे याच मुद्द्याच्या आधारे साधारण २ लाख ते ५ लाख रुपये या किमतीमध्ये दस्त झालेले आहेत. म्हणजेच जिराईचा दस्त २ लाख रुपये व बागायताचा दस्त ५ लाख रुपये किंवा जवळपास या किमतीने झालेला आहे. त्यामुळे सदर रकमेला अधीन राहूनच यानंतर चेन्नई-सुरत हायवेसाठी मिळणारा मावेजा अपेक्षित जिरायतासाठी आठ लाख रुपये किंवा फारतर बारा लाख रुपयापर्यंत पुढे जाऊ शकतो.

बागायत जमिनसाठी हाच मावेजा जास्तीत जास्त सात लाख रुपये किंमत पकडले असता (झालेल्या दस्ताची गृहीत किंमत) शेतक-याला त्याच्या चार पटीमध्ये पैसे मिळतील. म्हणजे २८ लाख रुपये एकरी बागायताची मिळतील. याच्यावरून शेतक-याची अशी अडचण निर्माण झालेली आहे की बहुतांश ठिकाणी यापेक्षा जास्त किंमती आहेत. त्यामुळे ७५ ते ८० टक्के शेतक-यांना सुरत -चेन्नई हायवेमध्ये कमीतकमी रक्कम मिळत आहे असे चित्र दिसून येत आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनोजकुमार मुनोत, जिल्हा संघटक भाजपा विकास कुलकर्णी, प्रा.घनश्याम गिलचे (आष्टी), अँड. प्रकाश गुंड (बार्शी), अँड. विकास जाधव, सागर कांबळे बार्शी, इंजीनियर अनमोल वाघमारे, शिवाजी पवार, सचिन पाटील पुणे, डॉ. कैलास गोरे फुलचंद नागटिळक आदींची उपस्थिती राहणार आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या