26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeउस्मानाबादलोहारा शहरात शौचालये घाणीच्या विळख्यात

लोहारा शहरात शौचालये घाणीच्या विळख्यात

एकमत ऑनलाईन

लोहारा : लोहारा शहरात मुतारी शौचालय घाणीच्या विळख्यात नगर पंचायत लक्ष देणार का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून केले जात आहे. शहरातील सर्व ठिकानातील रस्ते गटारी शौचालय मुतारी आदी भागातील साफ-सफाई करतेवेळी तेथील साचलेला गोळा केलेला कचरा तात्काळ उचलणे गरजेचे असताना कच-याचे ढीग तसेच साचलेले दिसतात तर शहरातील सौचालय व मुतारीची दुरावस्था बेवारशा प्रमाणे झाली आहे.

नागरिकांना कोणत्याही शासकीय कामासाठी प्रत्येक नागरिकांना शासनाने आता सौचालय प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे आणि बहुतांश प्रत्येक नागरिकांच्या घरामध्ये सौचालय बांधण्यात आले आहे असे असताना ही नागरीक सार्वजनिक सौचालयाचे वापर अधिक करतात आणि तसे नगरपंचायतच्या रेकॉर्डला सौचालयाची निगा व देखभाल व व्यवस्थापनाचे निधी द्वारे ठेकेदाराला रक्कम ही दिली जाते. परंतु या सौचालयाची आणि मुता-याची अवस्था बिकट झाली आहे.

इंदिरा नगर झोपडपट्टी भागात अवघ्या काही महिन्यांपूर्वी सौचालय बांधकाम केले आहे त्या ठिकाणी थातूर मातूर बांधकाम पाण्याचे आयोजन पाईप लाईन उबड धोबडं करून नागरिकांसाठी सौचालय सुरू करण्यात आले काही दिवस पाण्याचे व्यवस्थापन ही करण्यात आल यामुळे नागरिकांनी याचा वापर केला परंतु अवघे काही दिवस सुरळीत नागरिकांनी या सौचालयाचा वापर केला परंतु व्यवस्थापन आणि नगरपंचायतचे निष्क्रिय व्यवस्थापन करणारा निरीक्षक याच्या हलगर्जीपणामुळे आजच्या परिस्थितीत अनेक सौचालय ठिकाणी दुर्घन्धी पसरली असून पाण्याचे नियोजन नाही तर पाईप लाईन मोडकळीस झाली असून पाण्याच्या टाक्या रिकाम्या अवस्थेत आहेत.

तर चोहोबाजुनी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.प्रत्येक ठिकानातील सौचालयाची अवस्था अशीच असून सर्वत्र अवघ्या काही महिन्यात निकृष्ठ दर्जाचे कामे झाल्याने मोडकळीस व सर्व सौचालय निकामी झाले आहेत. तर शिवाजी चौकातील मुतारी हे मुख्य चौकातील असल्याने या मुतारीचा वापर अधिक आहे. तसेच बाहेर गावाहून येणाèया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने व शहरात मध्यवर्ती ठिकाणी एकच मुतारी असल्याने ते ही अस्वच्छतेच्या विळख्यात असल्याचे दिसून येते.

शिवाजी चौकात आजू बाजूला दुकाने थाटले आहेत वडापाव मोबाईल दुकाने हॉटेल व्यवसाय शिवण कारागीर शासकीय कार्यालय आदी असल्याने या परिसरात सर्वत्र दुर्गंधी येत आहे. नगर पंचायतीच्या निर्देशानुसार साफ सफाई चा ठेका देणा-याला अनेक बंधन नुसार ठेका दिले असले तरी सर्व कागदोपत्री मेळ घालून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-यांवर कुठलेही कारवाई न करता ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केले जात आहे. दस्तुरखुद्द नगर पंचायत प्रशासनाने या मुतारीचा पाहणी केल्यास सत्यता दिसून येईल अशी चर्चा नागरिकांतून केली जात आहे.

साफ सफाई च्या नावाने बोंबा बोब असून अशा घाणीच्या साम्राज्यात नागरीक लघुशंकेसाठी जातात दुसरा पर्यायच नसल्याने याच मुतारीचा वापर अधिक असल्याने तात्काळ नगरपंचायत विभागाने दखल घेऊन शहरातील सौचालय मुतारी साफ सफाई करावे अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या कोरोनाचे संकटकाळात शासनाकडून नागरिकांच्या आरोग्याबाबत दक्षता घेत अनेक उपाय योजना शासनस्तरावर राबवले जात आहे.कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना मात्र लोहारा शहरातील या मुतारीच्या दुर्गंधी मुळे व घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात मात्र नगरपंचायत प्रशासन कुचकामी धोरण अवलंबले जात असल्याने ठेकेदाराला महिन्याकाठी लाखो रुपये नागरिकांच्या आरोग्यावर खर्च केले जात असल्याचा बागुलबुवा करीत अमाप निधी वायफट खर्च केले जात असल्याने आता तरी नगर पंचायत प्रधासनाने तात्काळ याची दखल घेऊन शहरातील सर्व सौचालय व मुतारी याची निगा व देखभाल तसेच व्यवस्थापन तात्काळ करून नागरिकांच्या मूलभूत सोई सुविधा कडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून केली जात आहे.

Read More  महापालिका आयुक्तांना वृत्तपत्र विके्रत्यांचा घेराव

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या