27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeउस्मानाबादजिल्ह्यात ६१९ कोरोनाबाधित, शुक्रवारी १८ रुग्णांची पडली भर

जिल्ह्यात ६१९ कोरोनाबाधित, शुक्रवारी १८ रुग्णांची पडली भर

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोना आटोक्यात येईना झाला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दि. २४ सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्यात अहवाल आलेले असून त्यामध्ये १८ पॉझिटिव्ह निघाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ६१९ झाली असून यापैकी ४०० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. १८५ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून एकूण ३४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १८ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. त्यामध्ये उस्मानाबाद शहरातील जिल्हा रुग्णालयातील २, जिल्हा स्त्री रुग्णालयातील १, श्रीकृष्ण नगर पल्स हॉस्पीटलमागे १, रुईभर १, येवती १, यांचा समावेश आहे. तुळजापूर तालुक्यातील ९ रुग्णांचा समावेश असून त्यामध्ये काटी येथील ४, ठाकरे नगर नळदुर्ग १, अणदूर ३, काटी १, यांचा समावेश आहे. उमरगा तालुक्यातील २ रुग्ण असून त्यामध्ये केसरजवळगा येथील १, साईधाम उमरगा येथील १ जण आहे.

परंडा तालुक्यातील डोंजा येथे १ रुग्ण सापडला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून हे वातावरण कोरोना विषाणूला पोषक असल्याचे वाढत चाललेल्या रुग्ण संख्येवरून स्पष्ट होत आहे. एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडला की त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा स्वॅब घेतला जात आहे. यापैकी बरेचजण पॉझिटिव्ह सापडत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना विषाणू प्रयोगशाळा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे दुसèया जिल्ह्यातील प्रयोगशाळेवर विसंबून रहावे लागत होते. स्वॅब तपासणीसाठीही मर्यादा होत्या.

त्यामुळे जिल्ह्यात स्वॅब घेण्यासाठी क्वारंटाईन केलेल्या संशयतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता शहरातील विद्यापीठ उपकेंद्रात कोरोना विषाणू प्रयोगशाळा सुरू झाल्याने तसेच रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट किट उपलब्ध झाल्याने दररोज मोठ्या प्रमाणात प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी होतील, असे बोलले जात आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असलेल्या जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णासाठी बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. काही खाजगी दवाखाने कोविड उपचारासाठी प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. रुग्ण संख्या अशीच वाढत राहीली तर शहरातील सर्व खाजगी रुग्णालये प्रशासनाला ताब्यात घेण्याची वेळ येणार आहे.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशित गरजेची
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न व उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाच्या सुचनांचे पालन न करणाèया व्यक्तीवर कारवाई केली जात आहे. पोलिसाकडून दररोज हजारो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. परंतू नागरिकांचे वर्तन बदलताना दिसत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. शिस्त पाळली तरच कोरोना आटोक्यात येणार आहे.

दोन दिवस कळंब मध्ये जनता कफ्र्यु
सध्या जिल्ह्यात कोरोना बधितांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर कळंब शहरात याबाबत काळजी घेणे खूप आवश्यक झाले आहे. संसर्गाची चेन ब्रेक करण्याकरीता कळंब शहरातील लोकप्रतिनिधी, व्यापारी, प्रशासन सर्वांनी मिळून शनिवारी असलेला जनता कफ्र्यु दुस-या दिवशी म्हणजे रविवारी देखील पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारचा कफ्र्यु हा फक्त या रविवार पुरता मर्यादित असेल. तरी कळंब शहरात व डीकसळ येथे शनिवार रविवार दोन दिवस आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे जनता कफ्र्यु पाळावा असे आवाहन उप विभागीय अधिकारी, आहीलया गाठाल यांनी केले आहे.

अणदूर गावाला कोरोनाचा विळखा
अणदूरमध्ये कोरोनाचा हाहाकार माजला आहे. वाढत चाललेल्या रुग्ण संख्येला आळा घालणे कठीण वाटतं असून गावामध्ये मोठ्या प्रमाणावर बेफिकिरपणा दिसून येतो आहे. ना त्या कारणाने अनेक नागरिक पास काढून तर काही छुप्या मार्गाने सोलापूर जात आहेत. हे असेच चालू राहिले तर गावाला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल. गुरुवार (दि.२३) रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण संख्येत तीनने भर पडली आहे.

येथील जुन्या चावडी परीसरातील महिला (५४ वर्ष) महिला (२२ वर्ष) आणि पुरुष (२९ वर्ष) यांचा अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला अहवाल मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश गायकवाड व त्यांची टिम यांनी भागात भेट देवून २० जणांना क्वारंटाईन केले असून (दि.२४) रोजी जिल्हा कुष्ठरोग सहाय्यक डॉ रफिक अन्सारी यांनी भागाची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Read More  अकलुज येथे वाहतूक जोमात; संचारबंदी कोमात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या