33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home उस्मानाबाद उमरगा येथे १०० खाटांचे कोवीड केअर सेंटरचे उदघाटन

उमरगा येथे १०० खाटांचे कोवीड केअर सेंटरचे उदघाटन

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हयात महिला व बाल विकास भवन स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार उमरगा येथील जुन्या जिल्हा परिषदेतील कार्यरत असलेल्या महिला व बाल विकास कार्यालयात महिला व बालविकास भवनचे उदघाटन पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) या पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खा. ओमराजे निबांळकर, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जि. प. उपाध्यक्षा धनंजय सावंत, महिला बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, कृषी सभापती दत्ता साळुंके, तहसिलदार गणेश माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बळीराम निपाणीकर आदी उपस्थित होते. तसेच खाजानगर येथील मदिना चौकात असलेल्या नगर परिषदे शाळेत सुरू करण्यात आलेल्या मोहल्ला क्लिनिकचे उदघाटन पालकमंत्री व मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मैनोदीन पठाण, मसुद शेख, नगरसेवक इस्माइल शेख, खलील सय्यद, बीलाल रजवी, डॉ.के.के. बागवान, नगरसेवक बाबा मुजावर, नगरसेवक खलीफा कुरेशी, निसार बागवान, इंतियाज पटेल, जाफर मौलाना, बीलाल मौलाना आदी उपस्थित होते. तर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसरात मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निंबाळकर, संचालक दत्तात्रय गायकवाड, डॉ.प्रशांत दीक्षीत आदी उपस्थित होते.

उमरगा येथील मिनाक्षी मंगल कार्यालयात १०० खाटांचे कोवीड केअर सेंटरचे उदघाटन पालकमंत्री गडाख यांनी केले. त्यानंतर उमरगा उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड सेंटर, ईदगाह कोवीड सेंटर येथे त्यांनी भेट दिली. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, आ.ज्ञानराज चौघुले, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, कार्यकारी अभियंता अनिल सगर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, उप विभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ए. आर बडे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गडाख यांनी सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात भेट दिली व येथील आरोग्य सोयी सुविधांची पाहणी केली.

उद्यापासून सर्वांची जबाबदारी आणखी वाढणार आहे- जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या