25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeउस्मानाबादयुनिसेफ स्वयंशिक्षण प्रयोगच्या शाश्वत विकास प्रकल्पाचे उद्घाटन

युनिसेफ स्वयंशिक्षण प्रयोगच्या शाश्वत विकास प्रकल्पाचे उद्घाटन

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात महिला व मुलींच्या सहभागी व शाश्वत विकासाचा प्रकल्प मानवी विकासाच्या बाबतील भारतातील ११२ व्या क्रमांकावर आहे. कमी विकसीत जिल्हयांपैकी मुख्यत्वे शेतीवर अवलंबुन अर्थव्यवस्था असली तरी दुष्काळ, वाढलेला खर्चाची ताळमेल यातून समस्या अजुन बिकटच होते. याचा विचार करुन स्वयंम शिक्षण प्रयोगने युरोपीयन युनियनच्या पाठबळातून जिल्हयात सहभागी व शाश्वत विकासाच्या प्रकल्पाची सुरुवात केली. गुरुवारी (दि.२२) या प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, कृषी अधिकारी डॉ.जाधव, उमेदचे डिएमएम समाधान जोगदंड, शगुरु भांगे व निमंत्रीत ५० महिला उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध माहिती व मार्गदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आहे. व या प्रकल्पाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन युरोपियन युनियनच्या प्रमुख श्रीमती सीसीलिया कोष्टा यांनी केले. हा कार्यक्रम उस्मानाबादच्या यशवंतराव सभागृहात आयोजित केला होता. तसेच युरोपियन युनियनच्या प्रतिनिधीसह २२ देशातील प्रतिनिधीही व्हिडीओ कॉन्फरqसगव्दारे या कार्यक्रमास मार्गदर्शन केले.

एकूण १९८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी या उपक्रमाची प्रशंसाही केली. या कार्यक्रमात जिल्हयात २ डाळ उत्पादक संघ व १६ दूध संकलन संघ महिलांनी एकत्र येवून सुरु केले आहेत. शिवाय भाजीपाला व शेळी पालनाच्या माध्यमातून महिलांना मुल्यवर्धन साखळीचा फायदाही करुन दिला जाणार आहे. यावेळी उपमन्यु पाटील यांनी प्रकल्पाची ओळख व स्वयम शिक्षण प्रयोगचे कार्य मांडले. यावेळी सीसिलीया कोष्टा यांनी स्त्री-पुरुष समानता, महिला सक्षमीकरण क्षेत्रात स्वयम शिक्षण प्रयोग करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली. सक्षमीकरणासोबत महिलांनी नेतृत्वाचीही संधी मिळत असल्याने प्रगतीच्या वाटा रुंदावल्या, यापुढे कोणीही मागे राहणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सुनिता क्षिरसागर, प्रियंका पासले, भाग्यश्री यांनी मार्गदर्शन केले.

शहर-जिल्ह्यात कोरोनाने १० जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या