27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeउस्मानाबादभारतीय खो-खो संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी जाधव यांची नियुक्ती

भारतीय खो-खो संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी जाधव यांची नियुक्ती

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : येथील तेरणा महाविद्यालयाचे क्रिडा विभाग प्रमुख व क्रिडा प्रशिक्षक, अखिल भारतीय खो-खो संघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत भालचंद्र जाधव यांची भारतीय खो-खो संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

भारतीय खो-खो संघाचे सचिव एम.एस.त्यागी यांनी या संदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चौथ्या आशियाई आणि जागतिक खो-खो स्पर्धेसाठी प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांची निवड समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी प्रा.जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च शिवछत्रपती क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाला असून महाराष्ट्र खो-खो असोशियशनचे २०१० ते २०१८ या काळात सचिव म्हणून कार्यरत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या