सतीश टोणगे कळंब : उस्मानाबाद जिल्हयात चार तालुक्याच्या कोविड सेंटरवर व्हेंटिलेटर नसल्याने अडचणी येत होत्या तर ईमर्जशी पेशंट दगावत असल्याने अनेक वर्षापासुन व्हेंटिलेटर चि मागणी होती परंतु आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पालकमंत्री आरोग्यमंञ्याकडे पाठपुरावा करुन पाच ०हेंटिलटर मिळवुण दिल्याने कळंब करांची खुप वर्षापासुनची मागणी पुर्णत्वास आल्याने आता इमर्जशी रूग्णांचे प्राण वाचणार हे नक्की.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयामधे व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने हे रूग्णालय रेफर रूग्णालय म्हणून प्रसिद्ध होते.
कळंब येथील कोविड सेंटरमधे भुम परंडा वाशी तालुक्यातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतात वैद्यकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे यांनी आमदार कैलास घाडगे पाटिल यांच्याकडे एक व्हेंटिलेटरची मागणी केली होती १४ ऑगस्ट रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास पाटिल यांनी कोविड रुग्णालयाला भेट देवुन डायरेक्ट कोविड रूग्णांबरोंबर संवाद साधत अडचणी ऐकुण घेतल्या.
या वेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ जीवन वायदंडे डॉ स्वप्नील शिंदे यांनी व्हेंटिलेटरची मागणी करत कोविड सेंटरसाठी स्वतंत्र अँबुलन्स कोरोना संसर्ग झपाट्याने वाडत असल्याने भिषक तज्ञ तसेच कळंब शहर हे धाराशीव बार्शी लातुर अंबाजोगाई या ठिकाणापासुन ६० ते ७० की मी असल्याने अत्यावश्यक वेळी रुग्णांना रेफर करण्यासाठी अडचणी येतात त्या मुळे ३० बेडची ट्रामा केअर युनीटची आवश्यकता असुन प्रसुती माताचे प्रमाण अधिक असल्याने दर्जेदार सुविधेसाठी 2o बेडचे स्त्री रूग्णालय आवश्यक असत्याच्या मागण्या करण्यात आल्या खुप वर्षापासुनची व्हेंटिलेटरची मागणी लावुन धरत पालकमंत्री शंकरराव गडाख आरोग्यमंत्री राजेश टोपे यांथ्या कडे पाठपुरवा केल्याने आमदार कैलास पाटील यांनी पाच व्हेंटिलेटर मिळवुन दिले असुन ते बसवण्याचे काम सध्या चालु असल्याचे डॉ जिवन वायदंडे यांनी बोलताना सांगितले.
अभिनेता सुबोध भावे यांच्यासह पत्नी आणि मुलालाही करोनाची लागण