34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home उस्मानाबाद गणेश विसर्जनसाठी कळंब न.प.ने केली पाच फिरत्या वाहनांची सोय

गणेश विसर्जनसाठी कळंब न.प.ने केली पाच फिरत्या वाहनांची सोय

एकमत ऑनलाईन

सतीश टोणगे  कळंब : नगर पालीकेच्या वतीने कोरोना व लाॅकडाऊन च्या धर्तीवर गर्दी होऊ नये व रोग प्रसार होऊ नये म्हणून एक सप्टेंबर  मंगळवार च्या दिवशी स्वतंत्र पाच वाहनांची सोय करण्यात आलेली आहे.या कचरा उचलणारी घंटागाडी नसून खाजगी मालकीचे छोटा हत्ती वाहन केलेले आहेत.

हे वाहने आरोग्य व स्वच्छता विभागाने निर्धारित केलेल्या शहराच्या  पाच झोन मध्ये झोन निहाय एक वाहन प्रमाणे पाच झोन मध्ये पाच वाहन दिवसभर फिरतील.  प्रत्येक गल्ली बोळात जाऊन गणेश मुर्तीचा स्विकार करतील.  एकत्र केलेल्या सर्व मुर्तींना विसर्जन कुंडावर आणून रितसर भावपूर्ण आरती करून विसर्जन केले जाईल.

नागरिकांना व गणेश मंडळांना या द्वारे आवाहन करण्यात येते की आपापल्या ठिकाणी च श्री गणेशाची आरती करून निरोप द्यावा व पालीकेने सजवून पाठवलेल्या वाहनात बसवून निरोप द्यावा.  त्यानंतर पालीकेचे वाहनासोबत असणारे अधीकारी कर्मचारी एकत्र केलेल्या गणेश मुर्ती विसर्जन कुंडावर आणतील. तेथे पालीकेचे सर्वपक्षीय पदाधिकारी,  अधीकारी, कर्मचारी व महसूल आणी पोलीस डिपार्टमेन्ट चे अधिकारी रितसर भावपूर्ण आरती करून विसर्जन करतील. या व्यतिरिक्त कोणासही विसर्जन कुंडावर प्रवेश राहणार नाही.

संकटावर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी या सुचनांचे पालन करून बाप्पा ला निरोप द्यावा अशी विनंती उपविभागीय दंडाधीकारी सौ. अहिल्या गाठाळ,पोलीस उप अधिक्षक श्री सुरेश पाटील तहसीलदार सौ. मंजूषा लटपटे  नगराध्यक्ष सौ. सुवर्णा मुंडे,  उपाध्यक्ष श्री संजय मुंदडा  विरोधी पक्षनेते श्री शिवाजी कापसे मुख्याधिकारी श्री देवीदास जाधव पोलीस निरीक्षक श्री तानाजी दराडे  यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या