कळंब : खामगाव पंढरपुर या राष्ट्रीय नविन महामार्गाचे काम जंपींग रस्त्यामुळे मृत्युला निमंत्रण देणारा रस्ता असे अनेक अपघातातुन दिसुन आल्याने तीन वर्षापासुन खोदकाम करुन ठेवल्याने निकृष्ठ कामांच्या तक्रारी वाडल्या मेघा कंपनीने काम उरकरण्याचा सपाटा अधिका-यांना हाताशी धरून लावल्याने हे काम रस्ते विकास महामंडळाच्या माथी मारण्याच्या हालचालीने शासनाच्या कोट्यावधी रूपये नविन रस्त्यासाठी शाप तर मेघा साठी फायदेशिर ठरणार आहे.
खामगाव पंढरपुर या नवीन राष्ट्रीय दिंडीमार्गाचे काम गेल्या तीन वर्षापासुन संथ गतीने चालु असुन संपुर्ण रस्ता जंपींग बनल्याने या रस्त्यावरुन प्रवास म्हणजे मृत्युला निमंत्रण देण्यासारखे आहे. तीन वर्षापासुन खोदकाम करुन ठेवलेल्या कळंब येरमाळा रस्त्यावर अनेक अपघात होउन मरण पावले तर काहीजण मृत्युंशी झुंज देत आहेत. कुसळंब ते केज ६े की मी रस्ता काहि ठिकाणी तीन वर्षापासुन खोदकाम करून उकरून ठेवल्याने मृत्युला मिमंत्रण देत आहे अनेक अपघाताच्या मालिका घडल्या तरी अधिका-यांना जाग आली नाही आणखी किती बळी जाणार याचे सोयर ना सुतक कंपनी ला आहे.
मेघा कंपनी करतेय शासनाची फसवणुक
देशामधे नावलौकीक असलेल्या मेघा इंजिनियरिंग कंपनीने सबलेट टेंडर दिल्याने काम निकृष्ठ दर्जाचे होतेय एवडेच नव्हे तर संपुर्ण रस्ताच जंपिंग बनल्याने हि कंपनी काम उरकुन पोबारा करण्याच्या तयारीत आहे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाèयांना हाताशी धरूनच हे काम उरकण्यात येतेय काम दर्जाहिन होत असुनही या कडे दुर्लक्ष केले जात आहे.
डोंगरघाट भरला निकृष्ठ मुरमाने
येरमाळा येथील डोंगर घाट रस्त्यावर बारा मीटर उंचीचा रस्ता अगदि निकृष्ट दर्जाच्या मुरुमाने भरून हे काम उरकण्यात येत आहे गावातील लोकांनी या रस्त्याचे काम मध्यंतरी आीवले होते बारा मिटर उंचीचा रस्ताच निकृष्ठ दर्जाचा होत असल्याने सध्या जनतेत संतापाची लाट निर्माण झाली आहे.
जंपींग रस्ता एम.एस.आर.डी.कडे हस्तांतरण करणार शासनाचे कोटयावधी रुपयाची फसवणुक
मेघा इंजिनियरिंग कंपनीच्या कामाची मुदत केंव्हाच संपलीय पण रस्ते अीवणुकीच्या नावाखाली रस्ते खोदकाम करून ठेवुन कागदोपत्री अधिका-यांना हाताशी धरुन लाखोंचा दंड वाचवण्यात कंपनीला यश आले या मुळे सध्या घाईघाईत निकृप्ठ दर्जाचे काम करत हा रस्ता रस्ते विकास महामंडळाच्या माथी मारण्याचे काम चालु असुन शासनाला कोट्यावधी रुपयांचा फटका बसणार आहे. मुळ कामच निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने या सस्त्याच्या पुढिल काळात शासनच देखभाल दुरुस्ती करणार आहे या मुळे मेघाने शासनालाच फसवण्याचा प्रकार चालवलाय वेळीच लक्ष् दिल्यास कंपनीचे प्रताप उघडकीस येतील.
सैनिकाच्या मुलीस साई प्रसाद परिवाराने दिली साथ