23.9 C
Latur
Tuesday, November 24, 2020
Home उस्मानाबाद बांधकाम मजुरांच्या योजनांवर कामगार अधिकारी, दलालांचा डल्ला

बांधकाम मजुरांच्या योजनांवर कामगार अधिकारी, दलालांचा डल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यात गावोगावी आहेत दलाल कार्यरत, योजनेतील अर्धी रक्कम द्यावी लागते परत

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांना या योजनांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक सवलती देण्यात येतात. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयाच्या वतीने बोगस बांधकाम मजुरांची नोंदणी करून करोडो रुपयांच्या निधीवर पारदर्शक दरोडा टाकण्यात आला आहे.

बोगस लाभार्थीच्या नावावर जमा झालेली अर्धी (50 टक्के) रक्कम दलालामार्फत माघारी घेऊन मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याशिवाय बांधकाम मजुरांना सुरक्षा विषयक साहित्याच्या संचचा (किटचा) मोफत पुरवठा करण्याची योजना असताना प्रत्येक लाभार्थीकडून एक हजार ते दिड हजार रुपये दलालामार्फत उकळले जात आहेत. गुंजोटी (ता. उमरगा) येथे एकमतच्या टीमने या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला आहे.

2013 मध्ये राज्यात न्यायालयाच्या आदेशावरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे मंडळ प्रत्येक जिल्ह्यात सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाला जोडण्यात आले आहे, या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम मजुर म्हणून नोंदणी झाल्यानंतर लगेचच त्या मजुराच्या बँक खात्यावर 5 हजार रुपये आवश्यक बांधकाम हत्यारे, अवजारे खरेदी करण्यासाठी जमा केले जातात. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यासाठी गावोगावी दलाल तयार झाले आहेत.

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर सकारात्मकता

नोंदणी करण्यासाठी सुरुवातीला त्या मजुराकडून 500 रुपये घेतले जातात. नोंदणी झाल्यानंतर मजुराच्या खात्यावर जमा झालेल्या 5 हजारापैकी 2 हजार 500 रुपये त्या दलालाला द्यावे लागतात. पैसे देण्यास नकार दिल्यास पुढील मिळणारे लाभ बंद करण्याची धमकी दिली जाते. तो दलाल 2 हजार रुपये सरकारी कामगार अधिकार्‍याला पोहच करतो. अशा ही साखळी असून या कार्यालयाचे गावोगावी दलाल कार्यरत आहेत. बांधकाम मजुरांची मुले शाळेत, महाविद्यालयात असल्यास त्या विद्यार्थ्यांना 2500 रुपयापासून दोन लाखापर्यंत शैक्षणिक प्रतिपुर्ती रक्कम या मंडळाच्या वतीने दिली जाते. एवढी मोठी रक्कम मजुरांना सहज मिळत असल्याने या रकमेपैकी अर्ध्या रक्कमेवर दलाल व बांधकाम अधिकारी डल्ला मारतात. हा भ्रष्टाचार गावोगावी उघडपणे सुरू आहे.

सध्या जिल्ह्यात बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत मजुरांना मोफत सुरक्षा साधनांच्या संचचा (किट) पुरवठा केला जात आहे. गावोगावी याचे वाटप सुरू असून किटसाठी एका मजुराकडून एक हजार ते दिड हजार रुपये घेतले जात आहेत. गुंजोटी ता. उमरगा येथे दोन दिवसापासून या किटचे वाटप दिलीपकुमार राठोड ही व्यक्तीमार्फत होत असून ही व्यक्ती मजुरांकडून किटसाठी पैसे घेत आहे. याचे व्हिडीओ चित्रीकरण एकमतच्या टीमने केले असून अनेक बांधकाम मजुरांनी यामध्ये दलाल व कामगार अधिकारी यांच्यावर आरोप केले आहेत.

याबाबत सरकारी कामगार अधिकारी ए. एस. काशीद यांच्याशी संपर्क साधून विचारना केली असता ते म्हणाले, की नोंदणीकृत बांधकाम मजुरांना मोफत किटचा पुरवठा ठेकेदारामार्फत केला जातो. किटसाठी किंवा कोणत्याही योजनेचा लाभ देण्यासाठी कोणी पैसे मागत असल्यास आमच्या कार्यालयात लेखी तक्रार करावी, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे, श्री. काशीद म्हणाले.

उस्मानाबाद जिल्ह्यात 60 हजार बांधकाम मजूर
उस्मानाबाद जिल्ह्यात आजअखेर जवळपास 60 हजार नोंदणीकृत बांधकाम मजूर असून त्यांना प्रत्येकी 5000 रुपये अवजारे खरेदीसाठी देण्यात आले आहेत. अर्धी रक्कम परत करावी लागत असल्याने याच्या माध्यमातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या घरावर धाडी मारून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

आणखीन बातम्या

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

भाजपातर्फे राज्यभर वीज बिलांची होळी; वीज बिल माफी न केल्यास तीव्र आंदोलन !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) वाढीव वीज बिलांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने वाढीव वीज बिले रद्द न केल्यास तीव्र...

दिल्ली,गुजरात, गोवा व राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) दिल्लीसह काही राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट महाराष्ट्रात येऊ नये यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. दिल्ली, राजस्थान,...

नितिश मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

पाटणा : काही दिवसांपुर्वी शपथ घेतलेल्या बिहारमधील नितिशकुमार मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते. सध्या प्रत्येक मंत्र्याकडे पाच खात्यांची जबाबदारी दिली आहे....

फ्रान्सकडून पाकिस्तानला जोरदार चपराक

पॅरिस : पाकिस्तानकडे फ्रेंच बनावटीची मिराज फायटर विमाने, एअर डिफेन्स सिस्टिम आणि अगस्ता ९० बी वर्गातील पाणबुडी आहे. पाकिस्तानने या शस्त्रांमध्ये सुधारणा (अपग्रेडेशन) करण्याची...

कोरोनाच्या संसर्गावरुन सर्वाेच्च न्यायालय गंभीर

नवी दिल्ली : देशात सध्या पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून, अनेक राज्यांमध्ये पुन्हा उद्रेक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...