उस्मानाबाद : शहरातील वैराग रोड येथील कोविड केअर सेंटरमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पाहणी करण्यात आली. यावेळी याठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांकडे स्वसंरक्षणासाठी हॅन्ड ग्लोज, फेस मास शील्ड, सॅनिटायझर काहीच साहित्य नसल्याचे निदर्शनास आले. तसेच रुग्णांसाठी गरम पाणी, दर्जेदार जेवण नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सोयी-सुविधा देण्यात याव्यात अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिला आहे.
शहरातील वैराग रोड येथील कोविड केअर सेंटरमध्ये आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पाहणी करण्यात आली. यावेळी येथील कोव्हीड सेंटरमध्ये काम करणाèया कर्मचाèयांकडे स्वसंरक्षणासाठी हॅन्ड ग्लोज, फेस मास शील्ड, सॅनिटायझर असे काहीच साहित्य नसल्याचे निदर्शनास आले. कोविड रुग्णांसाठी गरम पाणी हे अत्यावश्यक असताना तेथे गरम पाण्याची सुविधा नाही, सोलरचा पाईप गंजल्यामुळे पाईप फुटलेला आहे.
तसेच सोलरचा कॉक वरती चालू बंद करण्यासाठी जाणा-या व्यक्तीला साडेपाच वाजता पहाटे सेफ्टीसाठी पीपीई कीट व हँड ग्लोज आवश्यक आहे. पेशंटला गरम पाणी उपलब्ध न होणे ही शासनाची अक्षम्य चूक आहे. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जेवणामध्ये विविध प्रकारची कडधान्ये, भाज्या असणे गरजेचे आहे. मात्र कमी दर्जाचे जेवण देण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. या सर्व गोष्टींचा त्रास रुग्णांना होत असल्याचे दिसून आले.
तसेच संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील कोवीड सेंटरला भारतीय युवा मोर्चाचे प्रतिनिधी हे भेट देतील, व ज्या समस्या समोर येतील ते जर शासनाने योग्य त्या सुविधा पुरवल्या नाही तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, याची शासनाने दखल घ्यावी असे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर , गणेश इंगळगे, अजय सपकाळ, भगवंत गुंड-पाटील, अक्षय भालेराव आदी उपस्थित होते.
शेती क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण – पंतप्रधान नरेंद्र मोदी