29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeउस्मानाबादलाखो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

लाखो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात 28 सप्टेंबर रोजी देवीला पारंपारीक, शिवकालीन दागदागिन्यांनी सजवण्यात आले होते. देवीचे रुप अत्यंत विलोभनीय दिसत होते. देवीचे रुप पाहून भाविक तृप्त होत होते. तिर्स­या माळे दिवशी देवीला निळ्या रंगाचा कलाकुसर बुट्टेदार शालू नेसविण्यात आला होता. बुधवारी लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

तिर्स­या माळेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या मंदिर सिंहगार्बा­यासह मंदिर परिसरात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. त्यानंतर देवीची धुपारती होऊन अंगारा काढण्यात आला. सकाळची देवीची आरती करण्यात आली. शिवाजी महाराज यांच्या काळातील महाराजांनी तुळजाभवानी देवीस अर्पण केलेले दागिने महापुजाच्या वेळी घालण्यात आले होते. हिरे, मोती, पांचु, रत्नजडीत अलंकार असलेले दागिने घालून महापूजा केली. तुळजाभवानी देवीची महापूजा मांडण्यात आली. तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

तत्पूर्वी मंगळवारी दुर्स­या माळेला सायंकाळी अभिषेकाची घाट झाल्यानंतर देवीचे यथासांग नित्य अभिषेक पूजाविधी पार पडले. त्यानंतर धुपारती होऊन अंगारा काढण्यात आला. मंगळवारी रात्री आश्विन शुद्ध 2. शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुर्स­या माळेदिवशी देवीजींची आरती झाल्यानंतर नारळी भात आणि पंच खाद्य, गोंिवद विडा दाखवून आरती करण्यात आली. त्यानंतर देवीजींच्या मुख्य चांदीच्या पादुका सिंह या वाहनामध्ये ठेऊन आणि देवीजींची चांदीची उत्सवमूर्ती वाहनांमध्ये छबीना काढण्यात आला. गेल्या वर्षी कोरोनामुळे नवरात्र महोत्सव भक्ताविना झाला होता. मात्र या वर्षी दररोज लाखो भाविकांना देवी दर्शनाचा लाभ होत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, तहसीलदार-मंदीर प्रशासन योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, पुजारी सेवेकरी यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या