25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपा वगळता सर्वपक्षीयाकडून देशव्यापी बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद

उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपा वगळता सर्वपक्षीयाकडून देशव्यापी बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

भूम तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकरी विरोधी तीन कायदे तात्काळ रद्द करावे या साठी जे दिल्ली मध्ये आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा म्हणून आज भारत बंद ठेवण्यात आले त्यात भूम तालुका सर्व पक्ष भाजपा व भाजपा मित्र पक्ष वगळता एकत्रित येऊन भूमीची व्यापरपेठ अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण पने बंद ठेवण्यात आले. भूम तहसील समोर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना,वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट आदी पक्ष संघटना एकत्रित येऊन उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करावे असे दिले.

वाशी तालुक्यात बंदला प्रतिसाद
दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला वाशी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला पाठिंबा दर्शवला आहे. पाठिंबा दर्शवत असल्याबाबतचे लेखी निवेदन तहसिलदारामार्फत शासनास देण्यात आले आहे. कृषी विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी केंद्र शासनाने अमान्य केल्याने दिल्लीतील शेतक-यांनी भारत बंदची हाक दिलेली आहे.

शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शवण्यासाठी परंडा बंद
केंद्र शासनाने शेतक-यांसाठी नवीन विधेयके पारीत केली ती शेतक-यांच्या विरोधात असल्याने नवीन विधेयक रद्द करण्याबाबत शेतकèयांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी दि. ८ डिसेंबर रोजी भारत बंद चे आवाहान करण्यात आले होते, त्या अनुशंगाने परंड्यात कडकडीत बंद पाळण्यात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एक तासभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले व नविन कृषी विधेयक धोरण रद्द करण्यासाठी तहसीलदारमार्फत निवेदन देण्यात आले व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

शेतकरी विरोधी कायद्दे रद्द करण्यासाठी कळंब शहर कडकडीत बंद
केंद्र सरकारच्या नवीन शेती विषयक कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकèयांच्या भारत बंदला महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष संघटना तर्फे सक्रिय पाठिंबा, दिला असून या बंद ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. कळंब तालुक्यातील महाविकासआघाडी तीन पक्ष इतर विरोधी पक्ष व संघटना यांच्या वतीने पंतप्रधान महोदय यांना उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले.

शेतकरी आंदोलन पाठींबा देत दाळींब येथे कडकडीत बंद
उमरगा तालुक्यातील दाळींबमध्ये शेतकरी आंदोलनात पाqठबा म्हणुन दाळींबमधील हॉटेल व्यवसायिक, किराणा दुकानदार, कृषी सेवा केंद्र, पाणटपरी, आदी दुकाने बंद करून शेतकरी विरोधात भाजप सरकारने केलेला काळा कायदा रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी देशातील विविध संघटना एकवटले असुन भारत बंदला समर्थन देत सर्व व्यापा-यांनी आप आपले व्यवहार बंद ठेऊन भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला. या बंद आंदोलनात ईकबाल पटेल, खय्युम चाकुरे, दयानंद माळगे, दिगंबर जाधव, नदीम मुगळे आदीनी पुढाकार घेतला.

दिल्ली येथील शेतक-यांना पाठींबा देत लोहारा शहर कडकडीत बंद
शेतक-यांच्या विरोधात कृषी विधेयक आणून शेतक-यांवर अन्याय केला असून दिल्ली येथे शेतक-याच्या आंदोलनाला १४ दिवस उलटत आले तरी देखील शेतक-यांच्या मागणीची अद्याप शासनाने दखल घेतली नसल्याने शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर भारत बंदच्या हाकमध्ये लोहारा येथील शेतक-याच्या वतीने आंदोलनास पाठींबा देण्यात आले.या भारत बंद च्या हाक मध्ये पाठींब्यात सर्वच राजकीय पक्षाचे भाजप वगळता पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारत बंदमध्ये पारगावकरांचा उस्फुर्त प्रतिसाद
शेतक-यांनी नाहीच केला पेरा तर खाणार काय धतूरा, मी शेतकरी पुत्र, इडा पीडा टळो बळीच राज्य येवो, केंद्र सरकार मुर्दाबाद, या अशा केंद्र सरकार विरुध्द घोषणा देत दीड तास धरणे धरत संपूर्ण गावातील व्यवहार उस्फुर्तपणे बंद ठेवत भारत बंद मध्ये पारगाव कारांनी सहभाग नोंदविला. वाशी तालुक्यातील पारगाव येथे भाजपाच्या केंद्रसरकर विरुद्ध सर्वपक्षीय व शेतकरी यांच्या वतीने पंजाब व हरियाणा यांनी सुरू केलेल्या शेतकरी विरोधी बिल रद्द करण्यासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आजच्या भारत बंद मध्ये उस्फुर्त प्रतिसाद देण्यात आला होता. सकाळ पासूनच व्यापारी बांधवांनी स्वतःहून आपापली दुकाने बंद ठेवली होती. पारगाव येथील मुख्य चौकात शेतकरी व विविध पक्षाचे नेते व संघटनेचे पदाधिकारी यांनी दीड तासभर धरणे धरले होते.

पुढील वर्षी सुरुवातीपासूनच नोक-यांचा सुकाळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या