21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeउस्मानाबादजागतिक वृध्द दिन व राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनी सुरू केलेले डॉ. पतंगे...

जागतिक वृध्द दिन व राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनी सुरू केलेले डॉ. पतंगे यांचे इंद्रधनु वृद्धसेवा केंद्र

एकमत ऑनलाईन

उमरगा : १ ऑक्टोबर जागतिक वृध्द दिन तसेच राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन या दोन्ही दिनाचे औचित्य साधून १९९५ साली ज्येष्ठ समाजसेवक डॉ दामोदर पतंगे यांनी अस्मिता विश्वस्त मंडळाची स्थापना केली. या दोन्ही दिनाचे औचित्य साधण्यासाठी या मंडळामार्फत इंद्रधनु वृध्द सेवा केंद्र व श्रीकृष्ण रक्तपेढी असे दोन सामाजिक उपक्रम उमरगा सारख्या तालूका स्तरावर सुरू केले.

जागतिक वृध्द दिनानिमित्त परिसरातील ज्येष्ठांना कौटुंबिक मजबुरीतून सुटका करून घेण्यासाठी पर्यायच नव्हता, तो पर्याय इंद्रधनुच्या रूपाने परिसरातील ज्येष्ठांचे मनोबल वाढवणारा ठरला. घरातील ज्येष्ठांना कुटुंबियांनी डावललं तर एक पर्याय आहे या वस्तुस्थितीने परिवारातील सर्वच जण ज्येष्ठांना घरातच समाधानी ठेवण्याचा भारतीय संस्कृतीतील परंपरेचे काटेकोर पालन होऊ लागले. खरेतर वृध्दाश्रम ही पाश्चात्य संस्कृती म्हणून सुरूवातीला या वृध्द सेवा केंद्रास ब-याच टिकेला सामोरे जावे लागले.

वृध्दाश्रम म्हणजे केवळ पारिवारिक विवंचनेतून सुटका करणारे केंद्र ही सर्वसाधारण मानसिकता बदलून ज्येष्ठांना आयुष्यातील अपूर्ण राहिलेले छंद जोपासणे, मनसोक्तपणे समवयस्कांच्या समवेत स्वच्छंदी जीवन जगणे, आयुष्यातील अनुभवाच्या शिदोरीचा उपयोग समाजाला करून देणे आणि हे सर्र्व करित असताना ज्येष्ठांच्या डोळ्यामध्ये आनंदी भाव पाहणे या संकल्पनेतून हे केंद्र मागील तेवीस वर्षांपासून पूर्ण प्रवेश क्षमतेने यशस्वीरित्या गरजू ज्येष्ठांच्या सेवेत तत्परतेने कार्यरत आहे.

याचबरोबर परिसरातील ज्येष्ठांना सन्मानपूर्वक वागणूक परिवार आणि समाजाकडून मिळत रहावी या उद्देशाने प्रतिवर्षी ज्येष्ठ नागरिक दिन सोहळ्याचे आयोजन प्रसिध्द साहित्यिक, व्यक्तीमत्वाच्या उपस्थितीत करण्यात येते. या सोहळ्यात परिसरातील आदर्श ज्येष्ठ दांपत्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात येतो. त्याचप्रमाणे घरातील ज्येष्ठांचा आदरपूर्वक सांभाळ करणाèया युवा दांपत्यास श्रावणबाळ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

श्रीकृष्ण रक्तपेढी
राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिन २०२० साठी राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने ठरवलेली थिम पूढील प्रमाणे आहे. Let’s donate blood voluntarily and contribute the fight against CORON अर्थात कोरोना विरूध्दच्या लढाईत ऐच्छीक रक्तदान करून सहभागी व्हा. संपूर्ण मराठवाड्यात तालूका स्तरावरील पहिल्या श्रीकृष्ण रक्तपेढी चे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेने या रक्तपेढीस विभागीय रक्त संक्रमण केंद्र म्हणून मान्यता दिलेली आहे. मागिल तेविस वर्षात पंचेचाळीस हजारांहून अधिक गरजू रूग्णांना या रक्तपेढीच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली आहे.

या रक्तपेढीने परिसरात ऐच्छीक रक्तदान चळवळ उभी केली. उमरगा व लोहारा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये जनजागृती करून ऐच्छीक रक्तदानासाठी सर्व पात्र रक्तदात्यांना प्रोत्साहीत करण्याचे कार्य अविरतपणे चालू आहे. प्रतिवर्षी १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिन आणी १४ जुन रोजी जागतिक रक्तदाता दिन याचे औचित्य साधून रक्तदाते व रक्तदान शिबीर संयोजक यांचा विशेष सन्मान केला जातो. याप्रमाणे जागतिक वृध्द दिन व राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिन हे दोन दिनविशेष एकाच संस्थेकडून साजरा करण्याचा मान मिळणे हे कदाचित दूर्मिळ म्हणावे लागेल.

अशा दूर्मिळ संस्था अर्थात अस्मिता विश्वस्त मंडळ चे संस्थापक अध्यक्ष डॉ दामोदर पतंगे आज वयाच्या त्र्याएेंशीव्या वर्षी अतिशय उत्साहाने या सोहळ्याच्या तयारीतच आहेत. परंतू कोविड लॉकडाऊनच्या नियमाने या संयुक्त उत्सवास थोड्याफार मर्यादा आल्या आहेत अशी खंत डॉ दामोदर पतंगे यांना आहे.
जागतिक वृध्द दिन व राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिन निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
प्रा अभयकुमार हिरास
सचिव, अस्मिता विश्वस्त मंडळ, गुंजोटी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या