30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home उस्मानाबाद शिवप्रेमींना उत्सुकता असलेले चला हवा येऊ द्या, शंभुराजे महानाट्य कार्यक्रम रद्द

शिवप्रेमींना उत्सुकता असलेले चला हवा येऊ द्या, शंभुराजे महानाट्य कार्यक्रम रद्द

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील शुक्रवारी (दि.19) पर्यंत व्याख्यान, आरोग्य तपासणी, रक्तदान यासारखे कार्यक्रम पार पडले. त्यामुळे आता शिल्लक राहिलेल्या चला हवा येऊ द्या, शंभुराजे महानाट्य कार्यक्रम होणार होते. मात्र अशातच कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे यापुढील कार्यक्रमास स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने शिवजयंती समितीला दिले आहेत. त्यामुळे समितीच्या वतीने यापुढील कार्यक्रमास स्थगिती देण्यात आल्याचे माहिती समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी व शिष्टमंडळाने शनिवारी (दि.22) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा प्रशासनाने समितीस आदेश देताच उस्मानाबादेत मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या वतीने तात्काळ पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. यावेळी या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, प्रकाश जगताप, युवराज राजेनिंबाळकर, राम मुंडे, शाम नवले, विशाल पाटील, रोहीणी कुंभार, प्रसाद मुंडे, अग्निवेश शिंदे, उमेशराजे निंबाळकर, संजय गजधने, प्रा. संतोष मुळे, भालचंद्र कोकाटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी यांनी सांगितले की, शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये 19 फेब्रुवारीपर्यंत काही कार्यक्रम झाले. त्यास शिवप्रेमींना मोठा प्रतिसाद दिला. रविवारी (दि.21) चला हवा येऊ द्या, फेम कलाकारांचा कॉमेडी शो व ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम तर सोमवारपासून बुधवारपर्यंत सलग तीन दिवस प्रा. नितीन बानगुडे लिखीत शंभूराजे महानाट्य आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाकडे जिल्हाभरातील शिवप्रेमींचे लक्ष लागले होते. परंतू जिल्हाधिकारी यांनी वाढत्या रूग्णांची संख्या पाहून 20 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यक्रमांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर पाणी फिरले आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या नियमानुसार हा आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित करत आहोत, असे समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी व शिष्टमंडळाने सांगितले.

लाखो रुपयाचा खर्च वायफट
शिवजयंती समितीच्या वतीने लाखो रुपये खर्चून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र वाढत्या कोवीड रुग्णांमुळे हा कार्यक्रम स्थगित होत आहे. या कार्यक्रमासाठी स्टेज, मंडप आदी यंत्रणा उभारण्यासाठी कार्यक्रमस्थळी साहित्य येवून पडले होते. तसेच काही कामही पुर्ण झाले होते. त्यामुळे हा झालेला सर्व खर्च वायफट ठरणार आहे.

शिवप्रेमींमध्ये मोठी नाराजी
शिवजयंतीनिमित्त चला हवा येऊ द्या, फेम कलाकारांचा कॉमेडी शो व ऑर्केस्ट्रा व प्रा. नितीन बानगुडे लिखीत शंभूराजे महानाट्य याकडे शिवप्रकमींचे विशेष लक्ष लागले होते. मात्र सदरील कार्यक्रम रद्द झाल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

ज्या दिवशी इंधनदरवाढ नाही तो ‘अच्छा दिन’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या