उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम, २०२० प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे कोव्हीड १९ उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र शासनाने कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दिनांक ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे कौस्तुभ दिवेगावकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ मधील तरतुदींनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार जिल्ह्यातील करोना विषाणु (कोव्हीड१९) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक ०१ नोव्हेंबर २०२० पासून ते ३० नोव्हेंबर २०२० रोजीचे २४.०० वाजेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवित असल्याचे आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात दिनांक ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनचे कालावधीत आदेशामध्ये नमूद गृह विलगीकरणच्या नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करणेबाबतचे आदेश संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. तसेच गैरकृत्यांबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.
लॉकडाऊनचे कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात या कार्यालयाचे सदरील आदेश लागू राहतील. या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश या आदेशासोबत दि. ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहतील. राज्य शासनाने व या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी अन्य कोणत्याही विशिष्ट सर्वसाधारण आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबी परवानगी आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तीसह चालू राहतील. तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून सोशल डिस्टंस पाळावे लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६०, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम २०२० चे नियम ११, साथरोग अधिनियम १८९७ तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदीनुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असे ही आदेशात नमुद केले आहे.
भूम तालुक्यातील आंबी येथिल शेतकऱ्यांचा मावेजा साठी रास्ता रोको आंदोलन