18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeउस्मानाबादकळंब येथे महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेडचा रास्तारोको

कळंब येथे महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेडचा रास्तारोको

एकमत ऑनलाईन

कळंब : शिवसेनेचे निष्ठावंत आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खेड्यापाड्यातील शेतकरी शुक्रवारी दि. 28 ऑक्टोबर रोजी कळंब येथे रास्तारोको मध्ये सामील झाले. आ. पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस असून शासन व विमा कंपनीला याचे सोयरं सुतक नाही, अशी अवस्था झाल्याने शिवसैनीक व शेतकरी आक्रमक झाला आहे. कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, शेतर्क­यांनी रास्तारोको आंदोलन केले.

गावागावातुन उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत. रास्तारोको ही आंदोलनाची झलक असून यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरग कुंभार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तानाजी चौधरी यांनी आपल्या भाषणातुन दिला आहे.

पीक विमा कंपनीने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत २०० कोटी रुपयावर शेतर्क­यांची बोळवण करून बाकीचे पैसे हडप करण्याचा प्रयत्न चालवला आहे. उर्वरीत नुकसानीचे ३३१ कोटी रुपये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शेतर्क­यांच्या खात्यात तात्काळ जमा करावेत, तसेच २०२१ चे ३३८ कोटी विमा कंपनीने शेतर्क­यांच्या खात्यावर जमा करावेत, या मागणीसाठी आ. पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले. उपोषणाचा आज पाचवा दिवस असून आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी गावागावातुन लोक रस्त्यावर उतरु लागले आहेत. यावेळी सरकारविरोधी घोषणेने परिसर दुमदुमुन गेला होता.

आज उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने आंदोलनातील कार्यकर्ते, शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसुन आले. शासनाने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ऍड. तानाजी चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक बळवंत तांबारे, माजी जि.प सदस्य बालाजी जाधवर आनंद चोंदे, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते, उपसरपंच सचिन काळे, माजी नगरसेवक मुस्ताक खुरेशी, बाबासाहेब मडके, सुरेश शिंदे आश्रूबा बिक्कड, कॉग्रेसचे दौलतराव माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. प्रवीण यादव, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य शंतनू खंदारे, शहराध्यक्ष मुसद्देक काझी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कवडे, विलास करंजकर,आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या