22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home उस्मानाबाद जिल्ह्यात महायुतीचे दुध दरवाढीसाठी आंदोलन

जिल्ह्यात महायुतीचे दुध दरवाढीसाठी आंदोलन

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : येथे दुध दरवाढीसाठी भाजपा, रिपाइं (आ), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती महायुतीच्या वतीने आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील व नितीन काळे यांनी दही घुसळून निघालेले लोणी प्रतिकात्मक श्रीकृष्णास खाऊ घातले. व या श्रीकृष्णाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी द्यावी व शेतक-यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर येडशी टोलनाक्यावर रास्तारोको करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अ‍ॅड. खंडेराव चौरे, नेताजी पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, राजसिंह राजेनिंबाळकर, इंद्रजित देवकते, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, अ‍ॅड. नितीन भोसले, संदीप कोकाटे, डॉ. गोविंद कोकाटे, राहुल काकडे, प्रवीण पाठक, शिवसंग्रामचे श्रीकांत भुतेकर, गणेश मोरे, पुजा देडे, नगरसेवक योगेश जाधव, बालाजी कोरे, दाजीप्पा पवार, विनायक कुलकर्णी, ओम नाईकवाडी, अरुण वीर, गजानन नलावडे, अनंत देशमुख, व्यंकट पाटील, नाना बोंदर, धत्तुरे नाना, सुजित साळुंके, गणेश इंगळगी, श्रीराम मुंबरे, अक्षय भालेराव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कळंब : उद्धवाने केले शेतकरी उध्वस्त, पाण्यापेक्षा झाले दूध स्वस्त, असे म्हणत भाजपने दूध दरवाढीच्या मागणीसाठी कळंब तालुक्यामध्ये आंदोलन केले. भाजप तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी भाजपचे सतपाल बनसोडे, प्रशांत लोमटे, प्रणव चव्हाण, संदीप बविकर यांच्यासह महिला कार्यकत्र्यादेखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. कळंब तालुक्यातील ५ दूध संकलन केंद्रासमोर भाजपने रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या काही दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करू, अशी प्रतिक्रिया तालुकाअध्यक्ष अजित पिंगळे यांनी दिली.

आंबी : भूम तालुक्यातील पाथरुड येथील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप, रासप आणि आरपीआय महायुतीच्या वतीने ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर नायब तहसिलदार पाटील यांच्याकडे मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे भूम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर,पंचायत समिती सदस्य सिताराम वनवे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अच्युतराव गटकळ, समाधान बोराडे, रोहिदास भोसले, गजेंद्र धर्माधिकारी, गणेश भोगिल, केशव तिकटे, युवराज तिकटे, शंकर झनझणे, हरिभाऊ वनवे, बाजीराव वनवे, दादा गव्हाणे, मीठू सलगर, दत्ता पाटील, गणेश गायकवाड, बापू नागरगोजे, अमर भोगील, सूर्यकांत महानवर, गिरी आदी उपस्थित होते.
परंडा : दूध उत्पादक शेतक-यांना वा-यावर सोडणा-या महाआघाडी राज्य सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांसह भारतीय जनता पार्टी, रासप, रिपाई-(आ.), रयतक्रांती, शिवसंग्राम पार्टी या महायुतीकडून सरकारचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन करण्यातज आले.

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. तसेच तालुक्यातील आनाळा, वारदवाडी, राजुरी, साकत येथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ.ठाकूर यांनी दुध उत्पादक शेतक-यांच्या बाबत राज्यातील आघाडी सरकार अकार्यक्षम आहे.

तसेच महाआघाडी सरकारने शेतक-यांच्या हिताचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे सांगुन नाराजी व्यक्त करून निषेध केला. यावेळी रिपाई प्रदेशचिटणीस संजयकुमार बनसोडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, रासपचे बप्पा काळे, शहराध्यक्ष अ‍ॅड. जहीर चौधरी, सरपंच श्रीकृष्ण शिंदे, पोपट गोडगे, विठ्ठल तिपाले, उपसरपंच महादेव बारसकर, हनुमंत पाटील, प्रमोद लीमकर, रामकृष्ण घोडके आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोहारा : लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. दूध रस्त्यावर न ओतता ते गरीबांना वाटप केले.

यावेळी भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र काळे, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस नेताजी qशदे, रिपाई तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, शिवशंकर हत्तरगे, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, इकबाल मुल्ला, प्रमोद पोतदार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, मल्लिनाथ फावडे, बाबा सुबेकर, शिवाजी दंडगुले, काशिनाथ घोडके, संतोष कुंभार, संतोष फरीदाबादकर आदी उपस्थित होते.

वाशी : दुध दरवाढ मागणीसाठी वाशी फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर महायुतीतील घटक पक्षांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा वाशी तालुकाध्यक्ष सचिन इंगोले, भाजपा नेते सुरेश कवडे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे, महादेव लोकरे, शहराध्यक्ष बबन कवडे, राजगुरु कुकडे, संतोष गायकवाड, राजु कवडे, बळवंत कवडे, दीपक कवडे आदी उपस्थित होते. त्यानंतर वाशी तहसीलदार संदीप राजपुरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

नारंगवाडी पाटी येथे रास्ता रोको
उमरगा : भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्याच्या वतीने उमरगा लातुर रोडवर नारंगवाडी पाटी येथे दुध दरवाढ संदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नारंगवाडी मंडळाचे मंडळ अधिकारी पी.जी. कोकणे व तलाठी एस.एस. गिरी यांनी निवेदन स्विकारले.

यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलिस उपनिरीक्षक ए.टी मालसुरे यांच्यासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हा. चेअरमन रमेश माने, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष माधव पवार, दिलीपqसह गौतम, सिद्धेश्वर माने लिम्बराज सोमवंशी, प्रदीप सांगवे, भागवत पाटील, राम लवटे, धर्मराज सोनवणे, दयानंद पवार, विठ्ठल चिकुंद्रे, धोंडीराम बिराजदार, किसन पाटील, किसन त्रिकोळे, भरत पवार, चेतन पवार, राहुल देशमुख आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More  संताप व्यक्त : राजस्थानमधील तमाशा मोदींनी बंद करावा- अशोक गेहलोत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow