24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeउस्मानाबाद३८ वर्षांत 12 वेळा 100 टक्के भरणाऱ्या मांजरा धरणात पाणीसाठा अद्यापही कमीच

३८ वर्षांत 12 वेळा 100 टक्के भरणाऱ्या मांजरा धरणात पाणीसाठा अद्यापही कमीच

एकमत ऑनलाईन

कळंब (सतीश टोणगे ) : पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे लाेकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली असतानाच दुसरीकडे मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर ,बीड जिल्ह्यावर पाऊस रुसल्याचे चित्र दिसत आहे. एेन पावसाळ्यातही जिल्ह्याला काही भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत अाहे.

केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारुर, या तालुक्यांना तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब व लातूर जिल्ह्यातील लातूर शहर, एमआयडीसी व मुरूड व अन्य काही गावांना या धरणातुन पाणी पुरवठा होतो. परंतु मागील दोन महिन्यात केवळ मांजरा धरण परिसरात ११० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. अाणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर तीनही जिल्ह्यांवर कोरड्या दुष्काळाचे संकट ओढवणार आहे.

मागील ३८ वर्षांत केवळ १२ वेळा या धरणात १०० टक्के पाणी साठा झाला होता. २०१७ मध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. २०१८ व १९ मध्ये कमी पावसाने हे धरण भरलेच नाही. त्याचा फटका यंदा बसला आहे. पाऊस रुसल्याने लातूर, उस्मानाबादसह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. शिवाय धरण भरलेच नाही तर अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

मांजरा धरणा”तील पाणीसाठा आला मृतसाठ्या बाहेर, बीड-लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याची तहान भागणार
केज व अंबाजोगाई शहरासह बीड-लातुर-उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणी साठ्याने दि. २१ आँगस्ट रोजी मृत साठ्याची पातळी ओलांडली असल्यामुळे या तीन ही जिल्ह्यातील अनेक गावात आता मांजरा धरण भरण्याची आशा निर्माण झाली आहे.

बीड जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यात यावर्षी जून महिन्यापासूनच दमदार पावसास सुरुवात झाली असल्यामुळे या तीनही जिल्ह्यात यावर्षी मांजरा पुन्हा लवकरच भरणार असा विश्वास निर्माण झाला होता. जून-जुलै आणि  आँगस्ट संपला असतांना मांजरा धरणातील पाण्याने अध्याप फक्त मृतसाठ्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे आता मांजरा धरण भरण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यातील अनेक भागात जूनच्या सुरुवातीपासून दमदार पाऊससुरु झाला आहे. पावसाचा जोर सर्व राज्यामध्ये असल्यामुळे राज्यातील अनेक मोठ-मोठे धरण भरुन वाहत  असल्याच्या बातम्या ऐकावयास मिळत असल्या तरी मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्य्पही समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे मांजरा धरणात अद्याप समाधानकारक पाणी साठा जमला नाही.

मांजरा धरणातुन जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहिती नुसार मांजरा धरणात फक्त 54.869 दलघमी
उपयुक्त पाणीसाठा 7.7.739 दलघमी, पाणी पातळी 636.23 मी., एकूण साठा 24.48%, 1/6पासून आवक     46.086 दलघमी
प्रकल्पीय जिवंत पाणी साठा  176.96  दलघमी,मृत पाणी साठा. 47.13  दलघमी,एकूण पाणी साठा 224.09 दलघमी
पूर्ण संचय पातळी   642.37 मी  दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. मांजरा धरणाच्या मृतसाठ्यातील पाणी साठवण क्षमता ४७.१३० दलघमी असून मृतसाठ्याबाहेर पाणी येण्यासाठी अजूनही ३.१०३ दलघमी पाणीसाठा आवश्यक आहे.  संपुर्ण धरण भरण्यासाठी २२४.०९३ दलघमी पाणीसाठा आवश्यक असतो.
मांजरा धरण एक दृष्टिक्षेप 
– ४३ किलो मीटरवर या प्रकल्पाचे पात्र असून ते सध्या कोरडे आहे
– धरणाची एकूण साठवण क्षमता : ५० दशलक्ष घनमीटर
– धरणातील शिल्लक पाणीसाठा : २४. १४८ दशलक्ष घनमीटर
मांजरा धरणातील उपसा 
लातूर शहर -२४ दलघमी, लातूर एमआयडीसी- ३ दलघमी, अंबाजोगाई – ३.५ दलघमी, कळंब- २.२५ दलघमी, केज व धारुर- १.५० दलघमी, मुरुड व शिराढोण – ०.५ दलघमी, युसूफवडगाव- ०.५ दलघमी इतके पाणी वर्षभरासाठी लागते. इतर गावांच्या योजनांसाठी अंदाजे २६ ते २७ दलघमी इतके पाणी घेतले जाते. याशिवाय शेतीसाठी पाणी घेतले जाते. परंतु आता या धरण परिसरात पाऊस झाला नाही तर दुष्काळाचे संकट ओढावणार आहे.

धनेगाव येथील मांजरा धरणातून सध्या लातूर शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवले जात असून रोज ३२ एमएलडी पाणी या धरणातून शहरासाठी उचलले जात आहे. लातूर एमआयडीसीसाठी वेगळे आरक्षण देण्यात आले आहे. लातूर शहराला येत्या काळात पाणीटंचाई भेडसावणार असल्याचे चित्र आहे. पाणी काटकसरीने वापरा या प्रकल्पाच्या परिसरात पाऊस जर पडला नाही तर परिस्थिती गंभीर बनणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या