18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeउस्मानाबादमांजरा धरण ८४ टक्के भरले

मांजरा धरण ८४ टक्के भरले

एकमत ऑनलाईन

कळंब: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मांजरा धरणात ८४ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे लातूर- उस्मानाबाद जिह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी धरण भरण्याची गरज आहे. पावसाचा जोर राहिला तर दोन दिवसांत धरण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांजरा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मांजरा धरणाच्या साठ्यावर बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिह्यांमधील नागरिकांची तहान भागते.

या जिह्यांमधील अनेक गावांना पाणीपुरवठा करणा-या या धरणामध्ये सध्या ८४ टक्के पाण्याचा साठा जमा झाला आहे. त्यामुळेच उन्ह्याळ््यातील संभाव्य पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र सिंचनासाठी हे धरण आणखी भरणे गरजेचे आहे. धरणामध्ये आणखी पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. मुक्कामी आलेल्या पावसामुळे मांजरा नदीपात्रात पाणीपातळीत वाढ झाली आहे. मांजरा धरण हे सलग तीन वर्षे हे धरण भरत आलेले आहे. त्यामुळे लातूर, बिड आणि उस्मानाबाद जिह्यातील शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरणो आहे. या वेळी धरण भरेल का नाही याची चिंता शेतक-यांना होती. धरण काठोकाठ भरल्यास सिंचनाचा प्रश्नही मिटणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या