21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादबंद घराचा कडी-कोयंडा तोडून १ लाख ९५ हजारांचे साहित्य पळविले

बंद घराचा कडी-कोयंडा तोडून १ लाख ९५ हजारांचे साहित्य पळविले

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यासह कौटूंबिक साहित्याची चोरी केली. ही घटना भूम शहरात घडली.

भूम शहरातील कैकाडगल्ली येथे लता माने या वास्तव्यास आहेत. दरम्यान, १२ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत माने यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील २० ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिन्यासह घरगुती वापराचे गॅस सिलिंडर, शेगडी, पाण्याची मोटार, दोन साड्या व ४० हजार रूपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ९४ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच माने यांनी भूम पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध ६ ऑगस्ट रोजी भादंसं कलम ४५७, ४५४, ३८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या