28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeउस्मानाबादखड्डयात कार कोसळून मायलेकीचा दुर्दैवी अंत

खड्डयात कार कोसळून मायलेकीचा दुर्दैवी अंत

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील कसई परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात कार कोसळून झालेल्या अपघातात मायलेकीचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर वडील व एक मुलगी जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी रात्री दि. १९ ऑगस्ट रोजी साडेनऊच्या सुमारास झाला. या प्रकरणी पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील कसई येथील सचिन पांडुरंग बनसोडे (वय ३३) हे स्वीफ्ट डिझायर कारमधून पत्नी अंकिता व मुली तृप्ती व तनुजा यांच्यासह गुलबर्ग्याहून कसई गावाकडे परत जात होते. कसई शिवारात रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्डयात साचलेल्या पाण्यात कार कोसळल्यामुळे चौघेही कारमध्ये अडकले. यातील सचिन बनसोडे व तनुजा ही मुलगी बचावली. दुर्दैवाने अंकिता (वय २६) व मुलगी तृप्ती (वय ७) यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीसांचे पथक तसेच तुळजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याचवेळी उस्मानाबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्याशी संपर्क साधून तेथील अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले. दोन्ही ठिकाणच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन मृतदेह बाहेर काढले. या दुर्घटनेने कसई गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या