24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादआमदार ज्ञानराज चौगुले कोरोना पॉझिटिव्ह

आमदार ज्ञानराज चौगुले कोरोना पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

उमरगा : शिवसेनेचे आमदार ज्ञान राज चौगुले यांचा गुरुवारी रात्री कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना मधुमेह व रक्तदाबाचा आजार असल्याने उपचारासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

आमदार चौगुले यांनी गेल्या चार महिन्यात कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी प्रशासनासोबत सक्रिय काम केले आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी त्यांनी प्रथम रॅपिड अँटीजेन चाचणी केली होती. मात्र ती निगेटिव्ह आली होती. मंगळवारी (दि.२८) स्वॅब दिल्यानंतर अहवाल इनकन्ल्यूझिव्ह आला होता.

पुन्हा गुरुवारी सकाळी स्वॅब दिल्यानंतर सायंकाळी उस्मानाबादच्या प्रयोगशाळेतील चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृतीची विचारपूस केली. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होवून जनतेच्या सेवा करण्यासाठी पुन्हा उपस्थित होवू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read More  आयपीएल आणि पीएसएलमध्ये खूप फरक: अक्रम

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या