29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeउस्मानाबादहृदयविकार, कॅन्सरची लक्षणे असणाऱ्या रुग्णाचे मृत्यू अधिक

हृदयविकार, कॅन्सरची लक्षणे असणाऱ्या रुग्णाचे मृत्यू अधिक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या पथकाने शनिवारी (दि.१०) जिल्हा रुग्णांलयातील कोरोना उपाययोजना आणि वैद्यकीय सोयी सुविधाबाबत उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकांशी संवाद साधला. यावेळी या संवादातून जिल्ह्यात हृदयविकार, कॅन्सरची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे अधिक प्रमाण आहे. कोरोना रुणाच्या लक्षणानुसार त्यांना उपचाराची दिशा ठरवली जाते, आदी विविध माहिती डॉक्टरांनी या पथकास दिली. यावेळी केंद्रीय पथकातील दोन्ही सदस्यांनी उपचार करणाèया डॉक्टरांचे कौतुक केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के. पाटील यांच्या दालनात संवाद झाला. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, केंद्रीय पथकात डॉ. अजित शेवाळे आणि लोकंद्र कुमार यांचा समावेश होता. यावेळी डॉ. डि.के.पाटील, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना उपचाराशी संबंधित समन्वय अधिकारी डॉ. मुल्ला यांनी कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार पध्दतीची, उपलब्ध साधन सामग्रीची आणि मनुष्यबळाची माहिती दिली.

जिल्हा रुग्णांलयात ३५६ बेड ऑक्सिजनची सोय असलेले आहेत तर १२७ व्हेंटिलेटर आहेत. याशिवाय जिल्हयातील आणि उस्मानाबाद शहरातील अनेक खाजगी रुग्णांलयांना कोविड सेंटर म्हणून जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.त्यामुळे खाजगी रुग्णालयातही कोरोना रुग्णांना उपचार घेता येत आहे, याशिवाय आणखी २०० बेड ऑक्सिजनच्या सुविधेसह तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे यावेळी डॉ. पाटील यांनी सांगितले. ऑक्सिजन बेड, आयसीयू युनिटमधील व्यवस्था, व्हेंटिलेटरची उपलब्धता आणि उपचार पध्दती याबाबत केंद्रीय पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच येणाऱ्या समस्या किंवा अडचणीबाबत विचारणा केली.

त्यावर डॉ. मुल्ला यांनी सध्या वाढत्या रुग्णं संख्येमुळे मनुष्यबळाची टंचाई जाणवत आहे. त्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टरांची सेवा घेतली आहे. परंतु नर्सेसची संख्याही कमी असल्याने अडचण येत असल्याचे सांगितले.एमबीबीएस डॉक्टरांचीही संख्या पुरेशी नसल्याचे ते म्हणाले. त्यावर पथकातील सदस्यांनी काही राज्यात बीएचएमएस आणि होमिओपॅथी डॉक्टरांना आयसीयू बाबतचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या सेवा घेतल्या जात आहेत, तो प्रयोग आपणास करता आला तर विचार करावा असे सांगितले.

तसेच नर्सेससाठी नर्सिंग महाविद्यालयातील अंतिम वर्षातील किंवा योग्य प्रशिक्षण झालेल्या नर्सेसना त्यांच्याच शिक्षकांना प्रथम कोरोना उपचार पध्दती आणि वैद्यकीय सेवेबाबत प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षीत करून त्यांना या नर्सिंग कॉलेजमधील विद्याथ्र्यांना प्रशिक्षित करून मदतीला घेता येईल का? याचाही विचार करता येईल, असे सूचविले. त्यावर डॉ. पाटील यांनी याबाबत आरोग्य संचालनालयाशी संपर्क साधून त्यांच्या सहमतीने नियोजन केले जाईल असे सांगितले. यावेळभ पथकांने जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. जिल्हा रुग्णालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लांटची, रुग्णांलयातील कोरोना ओपीडी आणि लसीकरण कक्षची पाहणी केली.

वरूडा रोड, तांबरी भागातील कंन्टेंटमेंट झोनची पाहणी केली.त्यांनतर जिल्हा परिषदेत कोरोना लसीच्या कोल्ड स्टोरेजला भेट दिली. एमआयडीसीतील आरटीपीसीआर टेस्टींग लॅबला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलीच्या वसतीगृहातील सीसीसी केंद्रास आणि आनंद नगरमधील नवाजपूरा येथील कंन्टेंटमेंट झोनला भेट देऊन या पथकाने पाहणी केली.

कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर लक्ष केंद्रीत केल्यास वेळीच रुग्ण सापडून इतरांना वाचविता येईल : लोकंद्र कुमारर्
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगच्या कामास गती देण्यात येत असून त्याचा दर २० टक्यांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे,असे सांगून जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिगसाठी घरोघरी जाऊन कोरोना रुणांच्या संपर्कात आलेल्याची माहिती ऑक्सीमीटर आणि थर्मलगनने तापमान घेऊन संकलित करण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या माध्यामातून केले जात आहे. त्यावर केंद्रीय पथकातील सदस्य लोकंद्रकुमार यांनी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगच्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत केल्यास वेळीच रुग्ण सापडून त्याच्यामुळे इतरांना कोरोनाची बांधा होण्यापासून वाचविण्याचे काम करता येईल, असे सांगितले. त्यावर हे काम जिल्ह्यात अविरतपणे सुरू असून होम क्वॉरंटाईन केलेल्याच्या घरावर स्टिकर लावून त्यांच्या संपर्कातील लोकांच्या कोरोना चाचण्याही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

मधुमेह नसलेल्या रुग्णास कोरोनाची लागण झाल्यास मधुमेहाचे लक्षण
मधुमेह नसलेल्या रुग्णांस कोरोनाची लागण झाल्यानंतर मधुमेहाची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर कोरोना प्रतिबंधात्मक उपचाराबरोबरच मधुमेह नियंत्रित करण्याचे कामही करावे लागत आहे. दुसऱ्या लाटेत वयोवृध्दांबरोबरच तरूणांचेही मृत्यू होत आहेत. तसेच हृदयविकार आणि कॅन्सरची लक्षणे असणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे, असे जिल्हा रुग्णांलयातील डॉक्टरांनी या पथकास सांगितले.

कोरोना रुग्णाच्या लक्षणानुसार उपचाराची दिशा
कोरोना रुग्णांमधील लक्षणानुसार उपचाराची दिशा निश्चित केली जाते. सौम्य, तीव्र आणि अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची वर्गवारी कोरोना बाहय रुग्ण विभागामध्ये केली जाते. तीव्र आणि अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्या लक्षणांचा विचार करून फिजिशियनच्या मदतीने उपचार केले जातात. ज्या रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला त्याची माहिती घेऊन त्यांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करण्याचे काम संबंधित यंत्रणांना सांगितले जाते.कोरोनाने मृत्यू झालेल्या प्रत्येक रुग्णांच्या मृत्यूबाबतची चिकित्सका किंवा ऑडिट आठ दिवसातून एकदा केले जाते. त्यावरुन इतर रुग्णांच्या उपचाराची दिशा ठरवून उपचार केले जातात,अशी माहिती डॉ.मुल्ला यांनी यावेळी पथकास दिली.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या