उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने अद्यापही विहीरी, कुपनलिका तुडुंब भरलेल्या आहेत. केवळ शेतीला कमी दाबाने विज पुरवठी होत असल्याने पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे. रब्बी हंगामात बोअरवर एक एकर पिक जोपासणे अवघड झाले आहे. त्यातच ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रकार वाढल्याने संकटात भरच पडत चालली आहे. यंदा शेती उत्पादन घटण्याला महावितरण कंपनी जबाबदार असणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात वरुण राजाने चांगली हजेरी लावली होती. परतीच्या पावसाने चांगली साथ दिल्याने जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. विहीरी, कुपनलिका तुडूंब भरलेल्या आहेत. काही ठिकाणी नदीकाठी तर अद्याप वाफसा नसल्याने शेतकèयांना पिकांची पेरणी करता आलेली नाही. यावर्षी सिंचनाची सोय झाल्याने शेतक-यांनी उधार-उसणवार करून रब्बीची पेरणी मोठ्या क्षेत्रावर केलेली आहे. काही शेतकèयांनी कांदा, बटाटा यासारख्या पिकांची लागवड पाण्याच्या भरोशावर केलेली आहे. महागडी औषधे, बियाणे घेऊन पेरणी केलेली असताना शेतीला पुरेशा दाबाने विजपुरवठा होत नसल्याने कृषीपंप चालत नसल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत.
शेतीला दिवसा व रात्री आठ-आठ तास विजपुरवठा केला जातो. दिवसा कमी दाबाने शेतीला विज मिळत असल्याने अनेक शेतक-यांच्या मोटारी चालत नाहीत. त्यामुळे काही शेतक-यांनी यावर तोडगा काढत निम्या निम्या शेतक-यांनी पंप सुरू ठेवून मार्ग काढला आहे. एका कुपनलिकेवर एक एकर क्षेत्र भिजत नसल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत. तसेच ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रकार वाढले असून पंधरा दिवसात चार-चार वेळा ट्रान्सफार्मर जळत आहेत. तो दुरुस्त करण्यासाठी शेतकरी वर्गणी करीत आहेत. यावर प्रत्येक शेतक-यांचा तीन महिण्यात १० हजाराच्या पुढे खर्च झालेला आहे. महावितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे शेती उत्पादनात यंदा घट आली आहे. शेतक-यांचा उत्पादन खर्चही यंदा निघत नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी नैराशेत जाऊन आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून याला नापिकी, कर्जबाजारीपणा, कमी दाबाने मिळणारी विज हे एक कारण आहे.
जिल्ह्यातील शेतक-यांनी यंदा मुबलक पाणी असल्याने बटाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड गेली आहे. महागडे बियाणे, खते घालून लागवड केली आहे. बटाटा हे पिक तीन महिण्यात येणारे पिक असून याला अडीच महिने पाण्याची आवश्यकता असते. पाणी कमी पडल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. अशीच वेळ बटाटा उत्पादकावर आली आहे. बटाटा लागवड केल्यानंतर कमी दाबाने विज मिळत असल्याने शेतकèयांचे विजपंप चालले नाहीत. ट्रान्सफार्मर वारंवार जळाल्याने पिकांना पाणी देता आले नाही. त्यामुळे एकरी उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. शेतकèयांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. अनेक शेतकरी उत्पादन घटल्याने निराश झाले असून त्यांना नैराशेने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या महिण्यात जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
कृषि कायद्यांमध्ये खासगी बाजारांना झुकते माप