24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादबलसूर शिवारात सालगड्याकडून दुस-या सालगड्याचा खून

बलसूर शिवारात सालगड्याकडून दुस-या सालगड्याचा खून

एकमत ऑनलाईन

उमरगा : बलसुर शिवारात सालगड्याचा विहीरीत पडुन मृत्यु झाल्याची घटना शनिवारी (२५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. शनिवारी रात्री मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून रामलिंग  मुदगडच्या दुस-या सालगडयावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी (२६) प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता बुधवार (दि २९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, बलसुर येथील शेतकरी भगवानदास तोष्णीवाल व विष्णुदास तोष्णीवाल या दोघा भावांची बलसूर शिवारात व्हंताळ रस्त्यालगत शेत जमीन आहे. दोघा भावाच्या शेतात कामासाठी दोन सालगडी असून शेतातच घर करुन वास्तव्यास होते. शुक्रवारी रात्री अकराच्या दरम्यान बसवराज बाबूराव माळी (रा.रामलिंग मुदगड) शेतमालकाच्या घरी येऊन दुसरे सालगडी पंडीत महानुरे यांना चार माणस मारहाण करत असल्याचे सांगितले. दोन्ही शेतमालक व इतर लोकांनी येऊन शहानिशा केली असता मागमुस लागला नाही. सालगडीही दिसला नाही.

पोलिसांनी संबंधिताचे घरी चौकशी केली पण तिकडेही गेले नाहीत. शनिवारी सकाळी विहीरीत शोधाशोध केली असता विहीरीत मृतदेह आढळून आला. मयत पंडीत निवृत्ती महानुरे (५२) (रा मुरुम) याचे डोक्याला जखमा झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती देणारा सालगडी बसवराज माळी यास संशयीत म्हणून उमरगा पोलिसांनी ताब्यात घेतले असता शनिवारी रात्री मयताचा मुलगा खंडू महानुरे यांनी माझे वडिल भगवानदास तोष्णीवाल यांचे शेतात सालगडी म्हणून कामास होते. त्यांच्याच भावाच्या शेतात विष्णुदास तोष्णीवाल यांच्या शेतात सालगडी म्हणून कामास असलेला बसवराज माळी याने तू शेत सोडून जा, नाहीतर तुझे काही खरे नाही असे म्हणत शिवीगाळ करून मारूनच टाकतो बघ म्हणून सातत्याने धमकावत त्यांने शनिवारी मध्यरा त्री तीन वाजण्याच्या पूर्वी कोणत्या तरी हत्याराने डोक्यात मारून ठार मारल्याची फिर्यादी दिल्याने पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या आदेशाने सहा. पोलिस निरीक्षक सिध्देश्वर यांनी बसवराज बाबूराव माळी याचे विरूध्द उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसवराज माळी यास रविवारी (२६) प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने बुधवार (दि २९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान शनिवारी मृतदेहावर उपजिल्हा रुग्णालय येथे शववि च्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read More  जिल्ह्यात ७२ कोरोना पॉझिटीव्ह

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या