24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeउस्मानाबादबुकनवाडीत तरूणाचा खून,०६ जणांच्या विरोधात गुन्हा

बुकनवाडीत तरूणाचा खून,०६ जणांच्या विरोधात गुन्हा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : एका महिलेच्या घरासमोर लघुशंका केल्याच्या कारणावरून बुकनवाडी (ता. उस्मानाबाद) येथील एका २० वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात विविध कलमासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील तपास करीत आहेत.

या घटनेची माहिती अशी की, बुकनवाडी हे गाव तेरपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. बुकनवाडी येथेच तेर रेल्वेस्टेशन आहे. येथील सुरेश अरुण काळे याने बुकनवाडी येथील एका महिलेच्या घरासमोर लघवी केली म्हणून याचा राग मनात धरून संशयित आरोपी पांडुरंग छगन वाकुरे, बालाजी छगन वाकुरे, पोपट छगन वाकुरे, योगेश अरुण वाकुरे, समाधान हरिभाऊ वाकुरे, अंकुश इंद्रजीत बुकन सर्व रा. बुकनवाडी या सहा जणांनी जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून गैरकायद्याची मंडळी जमवून बुकनवाडी शिवारातील शेतात १९ ऑगस्ट रोजी दुपारी सुरेश काळे याला लाथाबुक्यानी मारहाण करून त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्याचे प्रेत लिंबाच्या झाडाला लटकावले. अशा स्वरुपाची फिर्याद मयताची आई रुक्मिण अरुण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांच्या विरोधात विविध कलमासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील करीत आहेत.

दरम्यान, खुनाची घटना १९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली होती. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह २० ऑगस्ट रोजी तेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. मृताच्या नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी अशी मागणी लावून धरली होती. मयताचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरात तणाव वाढला होता. पोलिसांनी समजूत काढून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. २० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा बुकनवाडी येथील सुरेश काळे याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनामुक्त नागरिकांनी साथ द्यावी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या