30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादकळंब येथे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याची गरज

कळंब येथे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याची गरज

एकमत ऑनलाईन

कळंब (सतीश टोणगे) : कळंब तालुक्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलेले असताना येथील शासकीय रुग्णलयात ऑक्सीजन बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजनविना जीव गमावण्याची वेळ येऊ लागल्याने कळंब तालुक्यासाठी तात्काळ पुरेसे ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध असलेले कोव्हीड सेंटर करण्याची मागणी होत आहे.

कळंब तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दिवसेंदिवस मोठी वाढत आहे.सद्यस्थितीत दिवसाला ५० ते ६० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत.त्यामुळे ऑक्सिजन बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने बाधित नागरिकांच्या कुटूंबियांची प्रचंड धावाधाव होत आहे.तसेच धावाधाव करूनही ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नसल्याने भयावह चित्र कळंब शहरात सध्या दिसत आहे.उपजिल्हा रुग्णलयात अवघे ३० ऑक्सीजन बेड व १० व्हेंटिलेटर या सुविधा उपलब्ध असून ढोकी रस्त्यावरील कृष्णा हॉस्पिटल येथे १५ ऑक्सीजन बेड ची सुविधा उपलब्ध आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे.त्यामुळे कोरोना होणे हे जीवावरील संकट ठरू लागले आहे.पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर ची सुविधा उपलब्ध न झाल्यास वाढत्या कोरोना रुग्ण संख्या यामुळे मृत्यू दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध कोविड सेंटर सुरू करा-कदम
सध्या कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.तरी उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे अवघे तीस ऑक्सिजन बेडचे व दहा व्हेंटिलेटर असणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कृष्णा हॉस्पिटल डिकसळ या ठिकाणी पंधरा ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा उदभवत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता ही सर्व यंत्रणा कमी पडत आहे. त्यासाठी तात्काळ पुरेशी ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर सुविधा असलेले कोविड सेंटर उभारण्यात यावे,अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कळंब येथे १० व्हेंटिलेटर, ४५ ऑक्सीजन बेड उपलब्ध
कळंब तालुक्यातील ऍक्टिव्ह कोरोनाची रुग्ण संख्या २३६ झाली असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येण्याची संख्या वाढतच चालली आहे.त्यामुळे भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल या शक्येतेनुसार पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर कोव्हीड सेंटर तत्काळ सुरू करण्याची गरज असून कळंब येथे १० व्हेंटिलेटर,४५ ऑक्सीजन बेड उपलब्ध आहेत.

व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेड फुल्ल
व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड फुल्ल झाले आहेत.अतिगंभीर रुग्णांसाठी जीवरक्षक प्रणाली म्हणून व्हेंटिलेटर चा उपयोग केला जातो.अवघे १० व्हेंटिलेटर शासकीय रुग्ण लयाकडे उपलब्ध आहेत.अतिगंभीर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व्हेंटिलेटर देखील कमी अपुरे पडले आहेत.त्यामुळे कळंब शहरात ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर मिळणें कठीण होऊन बसले आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या