25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeउस्मानाबादनवे रूग्णालय १५ दिवसात चालू होणार : नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर

नवे रूग्णालय १५ दिवसात चालू होणार : नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबाद नगर परिषद व तुळजाभवानी सहकारी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद शहरात अद्यावत वैद्यकीय सुविधा असलेले सुसज्ज डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येणार असून या उपक्रमासाठी डॉक्टरांसह इतर ३२ जागा नगरपरिषदेच्या वतीने भरण्यात येणार आहेत. शहरातील नागरिकांच्या काळजी पोटी हा निर्णय घेतला आहे. हे नवे रूग्णालय येत्या १५ दिवसात सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी दिली.

उस्मानाबाद शहरातील स्त्री रुवणालयाच्या शेजारी असलेल्या मुलींच्या वस्तीगृहाच्या इमारतीत हे रुग्णालय सुरु होणार आहे. जवळपास ५० रुग्णांची व्यवस्था केली जाणार आहे. या सुसज्ज रुग्णालयात ऑक्सिजन यंत्रणा, रक्त तपासणी व आयसीयू बेडसह इतर वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. उस्मानाबाद नगर परिषद व तुळजाभवानी सहकारी रुग्णालयाच्या या कोविड सेंटरसाठी एक फिजिशियन डॉक्टर, चार एमबीबीएस डॉक्टर, सहा बीएएमएस किंवा बीएचएमएस डॉक्टर, दोन समन्वयक १२ नर्सिंग स्टाफ,४ सफाई कर्मचारी, एक लॅब टेक्नीशियन अशी पदे मानधन तत्वावर भरली जाणार आहेत. या रुग्णालयात वैदयकीय सेवा देण्यासाठी पात्र उमेदवारांनी किंवा वैदयकीय सेवा देणाèया संस्थांनी आपले अर्ज १३ ऑक्टोंबरपर्यंत दाखल करावेत असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व मुख्याधिकारी हरिकल्याण येलगटे यांनी केले आहे. तुळजाभवानी रुग्णालय या कोविड सेंटरसाठी लागणारी सर्व यंत्रणा, उपकरणे उपलब्ध करून देणार आहे तर नगर परिषद कर्मचारी यांचे मानधन देणार आहे.

उस्मानाबाद नगर परिषद कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जनजागृती मोहिमेसह सर्व आवश्यक सेवा नागरिकांना देत आहे. साफसफाई, सॅनिटायझरसह घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी व त्यानंतर त्याचा पाठपुरावा करीत आहे. कोरोना संकटात नगर परिषदेचे कर्मचारी हे प्रत्येक कुटुंबांच्या घरी जावून त्यांची तपासणी करीत आहेत. एखादी व्यक्ती कोणत्याही आजाराने ग्रासली असेल तर त्याची नोंद घेत ती माहीती आरोग्य यंत्रणेला दिली जात आहे. नागरिकांची ऑक्सीमीटरने ऑक्सीजन लेव्हल तपासणी करण्यात येत आहे.

ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशी लक्षणे असतील तर त्यांची नोंद घेऊन तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये संशयीत आढळून आल्यानंतर अँटीजन चाचणी घेऊन उपचारासाठी पाठविले जात आहे. नगर परिषदेच्या सभागृहात व्यापा-यासह नागरिकांची तपासणी मोहीम राबविली आहे. कोरोना संकट काळात नागरिकांनी स्वतःसह कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे असून उस्मानाबाद शहरात प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने निधन, चिराग पासवान यांच्याकडून ट्विट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या