कळंब (सतीश टोणगे): ना घर ना जागा तरीही ग्रामसेवक बँकेचे शाखाधिकारी यांनी आपल्या पत्नीच्या नावे शौचालयाचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ने दिनांक 11 सप्टेंबर रोजी गावातील ग्रामपंचायत समोर च्या चौकात हलगी बजाव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे मस्सा (ख.) तालुका कळबं येथील ग्रामपंचायत ने सौ श्रद्धा पंकज पालीवाल यांच्या नावे शौचालय दाखवून त्याचे अनुदान उचलण्यात आले आहे. मस्सा या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे या शाखेत शाखाधिकारी म्हणून पंकज पालीवाल हे गेल्या दोन-तीन वर्षापासून शाखाधिकारी म्हणून काम करत आहेत . या शाखा अधिकाऱ्यांच्या नावे ना गावात घर ना जागा तरीही ग्रामपंचायत सोबत संगणमत करून आपल्या पत्नीच्या नावे शौचालय आहे असे दाखवून ग्रामपंचायत मधुऊन मधून मिळणारे अनुदान हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
या प्रकरणाची संबंधित पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून या तील दोषींवर कडक कारवाई करावी म्हणून वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तालुकाध्यक्ष बी. डी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मस्सा ग्रामपंचायतील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने हलगी बजाव आंदोलन करून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले आहे.
या प्रकारामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून संबंधित शाखाधिकारी हा नांदेड जिल्ह्यातील असून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्याची कुठेही जागा किंवा घर नाही ते कळबं शहरातून रोज जाणे येणे करत होते. असे असतानाही ग्रामपंचायतीने मात्र अधिकाऱ्यांशी व पदाधी कर्यांशी संगनमत करून त्यांच्या पत्नीच्या नावे शौचालयाचे अनुदान काढून मोठा भ्रष्टाचार केल्याचं उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर शाखाधिकारी यांनी गावामध्ये दोन ते तीन वर्षापासून शेतकरी व ग्राहक यांच्याकडून वेगवेगळी आमिषे दाखवून अमाप संपत्ती गोळा केली आहे त्यांच्याही या संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनात तालुकाध्यक्ष बी डी शिंदे, शिवाजी कांबळे ,अक्षय कांबळे, अच्युत शिंदे, नरसिंग ओव्हाळ ,विकास शिंदे, आदी उपस्थित होते.