33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home उस्मानाबाद व्यक्ती जिवंत असताना मृत्यू प्रमाणपत्र मिळवले

व्यक्ती जिवंत असताना मृत्यू प्रमाणपत्र मिळवले

एकमत ऑनलाईन

वाशी : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी येथील शिवाजी बाबुराव बारगजे यांनी खोट्या माहितीच्या आधारे मृत्यू प्रमाणपत्र मिळवले. प्रकरणी त्यांच्याविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. व्यक्ती जिवंत असताना प्रशासकीय कर्मचाèयांना हाताशी धरून शिवाजी बारगजे यांनी आण्णा नारायण बारगजे यांचा मयताचा दाखला मिळवून आण्णा बारगजे यांच्या कुटुंबाची व शासनाची फसवणूक केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी वेळीच या प्रकरणाची दखल न घेतल्याने न्यायालयाच्या आदेशाने शिवाजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी पोलिस ठाण्यात येथे नोंदवलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आण्णा नारायण बारगजे हे जिवंत असताना वाशी येथील शिवाजी बाबूराव बारगजे यांनी उपविभागीय अधिकारी भूसंपादन कळंब यांच्याकडे चालत असलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ मधील भूसंपादन झालेल्या क्षेत्रातून त्यांना आर्थिक फायदा व्हावा व आण्णा नारायण बारगजे यांच्या वारसाचे आर्थिक नुकसान व्हावे या उद्देशाने २५ नोव्हेंबर २०११ रोजी आण्णा नारायण बारगजे यांचे मृत्यु प्रमाणपत्र मिळण्यासाठी खोटा अर्ज व शपथपत्र वाशी तहसील कार्यालयात दाखल केले. तत्कालीन तहसीलदार यांनी त्यावेळचे वाशी मंडळ अधिकारी व वाशी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्या अहवालावरून ३० नोव्हेंबर २०११ रोजी आण्णा नारायण बारगजे यांचा मृत्यू वाशी येथे २२ सप्टेंबर १९७५ रोजी झाला असून तशी नोंद वाशी ग्रामपंचायत जन्म-मृत्यू रजिस्टर मध्ये घेण्यात यावी असे आदेशित केले.

आण्णा बारगजे यांचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र शिवाजी बारगजे यांनी मिळवले असल्याबाबतची माहिती त्यांचेच नातेवाईक अजिंक्य दिनकर उर्फ दिनेश बारगजे यांना कळंब येथील भूसंपादन कार्यालयाकडून मिळाली. यानंतर अजिंक्य यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. अजिंक्य यांनी फिर्यादीत असे म्हटले आहे की आण्णा नारायण बारगजे हे १३ जानेवारी १९७७ रोजी जिवंत होते. आण्णा यांनी २९ जुलै १९७६ रोजी खरेदी खत दस्त क्र.१२१०/१९७६ हा दस्त व १३ जानेवारी १९७७ रोजी ९४/१९७७ हे दस्त लिहून दिलेले आहेत. लिहून देणार म्हणून त्या दस्तावर त्यांची स्वाक्षरी आहे. म्हणजेच १३ जानेवारी १९७७ रोजी आण्णा नारायण बारगजे हे जिवंत होते. असे असताना शिवाजी बारगजे यांनी प्रशासकी य अधिका-यांना खोटी माहिती पुरवून ते २२ सप्टेंबर १९७५ रोजी मयत झाले असल्या बाबतचा दाखला मिळवला.

शिवाजी बाबुराव बारगजे यांनी स्वतःच्या हितासाठी तत्कालीन ग्रामसेवक, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला .यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक .मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी देखील कागदपत्राची आणि वास्तवतेची खात्री न करता शिवाजी बाबुराव बारगजे यांना खोटे मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. सदर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजी बाबुराव बारगजे यांचे विरुद्ध वाशी पोलिस स्टेशन येथे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १८३, ४२०, ४६५, ४६८ – ४७१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मृत्यू दाखला बोगस आणि खोट्या माहिती आधारे दिल्यामुळे या प्रकरणांमध्ये आणखी जे काही कर्मचारी सहभागी असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंगाली पटकथा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या