22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादशिंदे गटाकडून आजही ऑफर, दबाव येतोय : आ. कैलास पाटील

शिंदे गटाकडून आजही ऑफर, दबाव येतोय : आ. कैलास पाटील

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शिवसेना सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आजही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. कधी आमिष दाखवून ऑफर दिली जात आहे तर कधी दबाव टाकून प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट कळंब-उस्मानाबाद मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर येथे युवासेनेच्या मेळाव्यात केला आहे. युवासेनेचे राज्य सचिव वरूण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दि. १० सप्टेंबर रोजी तुळजापूर येथे युवासेनेचा मेळावा झाला.

यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. कैलास पाटील यांनी शिवसेना सोडण्यासाठी आजही विविध ऑफर येत असल्याचा गौप्यस्फोट केला. कितीही ऑफर आल्या, दबाब आला तरी शिवसेना सोडणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला. आजही काही सहकारी आमदार यांच्यामार्फत निरोप येतात. शिवसेनेने आम्हाला ओळख दिली. उमेदवारी दिली. त्यामुळे आम्ही खुर्चीवर बसू शकलो. सर्वसामान्य मतदार व शिवसैनिक यांच्यामुळे आम्ही आमदार, खासदार झालो. त्यामुळे कितीही ऑफर आल्या तरी शिवसेना सोडणार नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी मेळाव्यात शिवसैनिकांना दिली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या