27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउस्मानाबादस्कार्पिओ-दुचाकीच्या धडकेत एक ठार; गुन्हा दाखल

स्कार्पिओ-दुचाकीच्या धडकेत एक ठार; गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : अज्ञात स्कार्पिओ गाडी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात मुलगा ठार झाला असून, आई गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात तुळजापूर तालुक्यातील हंगरगा फाटा येथे घडला.

उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) येथील बाळासाहेब नवनाथ मोरे व भारतबाई मोरे हे दोघे आई व मुलगा २५ मे रोजी तुळजापूर तालुक्यातील हंगरगा फाटा येथील रस्त्याने दुचाकीवरून (क्र. एमएच २५/डब्ल्यू/१८५१) जात होते. यावेळी अज्ञात स्कार्पिओच्या (क्र. एमएच २३/ई/९१८१) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून मोरे यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. सदर अपघातात बाळासाहेब मोरे हे मयत झाले तर त्यांची आई भारतबाई मोरे (७५) या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी सचिन नवनाथ मोरे यांनी २८ मे रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात स्कार्पिओ गाडी चालकाविरूद्ध भादंसं कलम २७९, ३३८,३०४ (अ) सह मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या