21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादसिंदफळ येथे रक्षाबंधनाच्या दिवशी एकाचा खून

सिंदफळ येथे रक्षाबंधनाच्या दिवशी एकाचा खून

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तालुक्यातील सिंदफळ येथे वस्तीवर राहणा-या एका ६२ वर्षीय व्यक्तीवर झोपलेल्या ठिकाणी हल्ला करून खून केल्याची घटना दि. ११ ऑगस्ट रोजी घडली आहे. या हल्ल्यामध्ये एक कुत्राही ठार झाला आहे. सदर खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा सिंदफळ येथे सुरू आहे. दरम्यान, खूनाची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

गुरूवारी दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खूनाची घटना उघडकीस आली आहे. किसन मनोहर सिद्धगणेश (६२) हे सिंदफळ येथील अनिल भोसले यांच्या घरी राहत होते. राहत्या घरीच किसन सिद्धगणेश यांच्यावर १० ते ११ ऑगस्टच्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने झोपलेल्या ठिकाणी लोखंडी हत्याराने हल्ला करून निर्दयीपणे खून केल्याची घटना उघडकीस आली. या हल्ल्यांमध्ये मारेक-यांने कुत्र्यालाही ठार मारले आहे. ऐन रक्षाबंधन दिवशीच घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती घर मालक अनिल भोसले यांनी पोलिसांना दिली. पोलिस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा प्रकार अनैतिक संबंधातून घडला असल्याची चर्चा गावामध्ये सुरू होती. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब पथक व श्वानपथक हे तात्काळ दाखल झाले. पोलिस श्वान पथकाद्वारे आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

घटनास्थळी तुळजापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशीलकुमार चव्हाण, सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, सपोनिविठ्ठल चासकर, पोलिस उपनिरीक्षक बसवेश्वर चनशेट्टी, पोकॉ संजय लोखंडे, पोना दिलीप राठोड, पोकॉ अतुल यादव, पोकॉ सनी शिंदे, पोकॉ संतोष पवार, एएसआय चालक रवी शिंदे, पोना सचिन राऊत तातडीने दाखल झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या