उस्मानाबाद ः प्रतिनिधी चालकाने निष्काळजीपणे कार चालवून गाडीचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर झाले. हा अपघात वाशी तालुक्यात झाला. या प्रकरणी चालकाच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात 15 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकिय वसाहत जातेगाव, ता. गेवराई येथील महेश अनंत काळे यांनी स्वतःचे ताब्यातील कार क्रं. एमएच 48 एस 2490 फोर्ड क्लासीक निष्काळजीपने चालवली. त्यामुळे कारचे डाव्या साईडचे टायर फुटल्याने कार पलटी झाली. या अपघातात श्रीकृष्ण रघुनाथ काटे हे जखमी होवून मयत झाले. तर मानसी महेश काळे, पुष्पा काळे ह्या जखमी झाल्या. या प्रकरणी शिल्पा काळे यांनी दि.15 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह 184 मो.वा.का. अंतर्गत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.