उस्मानाबाद : उसने दिलेले पैसे परत न केल्याने एका व्यक्तीस डांबून ठेवले. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. बार्शी तालुक्यातील चुंब येथील यिद्धेश्वर रामभाऊ जाधवर (वय ६२) हे भूम येथील सतीश भोळे यांना कांही रक्कम देणे लागत होते. या रक्कमेच्या वसुलीसाठी भोळे यांनी जाधवर यांच्याकडे तगादा लावला होता. शिवाय, दिलेली रक्कम परत करणे शक्य नसल्यास जाधवर यांच्या भाऊ व भावजयीच्या मालकीचे घर व जागा आपल्या नावावर करून देण्याचा तगादा लावला होता.
दरम्यान, जाधवर हे २३ नोव्हेंबर रोजी भूम येथे आले असता भोळे यांनी त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने अज्ञातस्थळी डांबून ठेवले. त्यांना सोडण्याच्या मोबदल्यात येणे असलेली रक्कम किंवा त्या मोबदल्यात घर व जागा आपल्या नावावर करून देण्याची मागणी भोळे यांनी केली. या प्रकरणी जाधवर यांचा भाऊ अंगद रामभाऊ जाधवर यांनी भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सतीश भोळे याच्या विरूद्ध २८ नोव्हेंबर रोजी भा.दं.सं. कलम- ३४२, ३६४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.