33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home उस्मानाबाद कांदा ट्रक पलटी; तीन ठार एक जखमी

कांदा ट्रक पलटी; तीन ठार एक जखमी

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तिर्थक्षेञ तुळजापूर परिसरातील आरादवाडी भागाजवळील उस्मानाबाद सोलापूर बायपास रस्त्यावर कांदा घेवुन जाणारा ट्रक पलटी झाला. यात तीन ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना बुधवारी (दि.१६) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. मयत हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नेकनूर येथील रहिवाशी आहेत. यामध्ये दोन शेतकरी तर एक ड्रायव्हरचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि.१६) पहाटे ३ वाजण्याचा सुमारास बीडवरून सोलापूरकडे कांदा घेऊन जात असलेली ट्रक क्र. (१६-­ए-७७०४) तुळजापूर जवळ भारती बुआ मठाजवळ महामार्गावर पलटी झाला. या अपघातामध्ये तीन मयत तर एक जखमी झाले आहे. मयतमध्ये दोन शेतकरी तर एक ट्रक ड्रायव्हर आहे. अपघातात मनोहर भागवत मुंडे (वय ५०), दसरथ धोंडीबा शिंदे (वय ५०) व ड्रायव्हर शेख साजीद शखल (वय ३८) हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, पोलीस कॉ. अजित सोनवणे, पोलीस कॉ. गणेश पतंगे, होमगार्ड खांडेकर, होमगार्ड राठोड हे घटनास्थळी तत्काळ दाखल झाले व भागवत शिवाजी मुंडे जखमी यांना १०८ रुग्नवाहिकामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

पोलिस आल्याने शेतक-यांच्या कांदा वाचवला
कांदा ट्रक पलटी होताच आरादवाडी भागातील युवक अपघात ग्रस्तांचा वाचविण्यासाठी धावत होते. तर लोकजण मात्र ट्रकमधील कांदा घेवुन जाण्यासाठी पळपळ करत होते. माञ पोलिस घटनास्थळी आल्याने कांदा चोरण्याचा उद्देशाने आलेल्या मंडळीना चाप बसला व सदर शेतकèयाचा कांदा वाचला.

अंबानींच्या कार्यालयावर मोर्चा नेणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या