31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeउस्मानाबादधाराशिव येथे एसटी कर्मचा-याला 25 हजाराला ऑनलाईन गंडा

धाराशिव येथे एसटी कर्मचा-याला 25 हजाराला ऑनलाईन गंडा

एकमत ऑनलाईन

धाराशिव : शहरातील राज्य परिवहन महामंडळातील मेकॅनिकला एका भामट्याने मोबाईलवर मेसेज पाठवून पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे मोबाईलवर प्रक्रिया केल्यानंतर बँक खात्यावरील 24 हजार 997 रूपये ऑनलाईन लंपास झाले. या प्रकरणी अविनाश शिवाजीराव मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव येथील सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, : एस.टी कॉलनी, धाराशिव येथील अविनाश शिवाजीराव मांजरे हे एसटी महामंडळात मेकॅनिक म्हणून नोकरीस आहेत. त्यांना ११ मार्च रोजी रोजी सकाळी १०.४२ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी फोन क्रमांकावरुन एसबीआय बँकेचा लोगो असलेला टेक्स्ट मेसेज आला. त्या मेसेज मध्ये त्यांना पॅन कार्ड अपडेट करण्याबाबत सांगीतले.

 

यानंतर मांजरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये लिंकला टच केल्यानंतर एसबीआय युनो पेज ओपन झाला. त्यात आपल्या बँक खाते विषयक गोपनिय माहिती भरली. यानंतर मांजरे यांच्या बँक खात्यातून एकुण २४ हजार ९९७ रूपये रक्कम कपात झाली.या प्रकरणी अविनाश मांजरे यांनी दि. २८ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- ६६ (सी), ६६  (डी) अंतर्गत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या