21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादमोबाईल चोरून एकाची २ लाखांनी ऑनलाईन फसवणूक

मोबाईल चोरून एकाची २ लाखांनी ऑनलाईन फसवणूक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : एसटी बस प्रवासात एकाचा मोबाईन चोरून त्या मोबाईलद्वारे एकाच्या बँक खात्यावरील २ लाख रूपये चोरट्यांने ऑनलाईन लंपास केल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात लोहारा पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील चिंचोली (काटे) येथील संदिपान शिवाजी सुर्यवंशी हे दि. ७ ऑगस्ट रोजी शिंगणापुर (शिखर) ते चिंचोली (काटे) असा एसटी प्रवास बसने प्रवास करीत होते. त्यावेळी संदिपान सुर्यवंशी यांच्या शेजारी एक प्रवाशी बसलेला होता. ते बसमध्ये मोबाईल हाताळत असताना जवळ बसलेल्या प्रवाशाने स्मार्टफोनमधील युपीआय प्रणाली हातळल्याचे पाहिले.

यानंतर त्या व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून सुर्यवंशी यांचा मोबाईल लंपास केला. यानंतर त्या व्यक्तीने सुर्यवंशी यांच्या मोबाईल मधील युपीआय प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यातील २ लाख रूपये रक्कम ऑनलाईन पध्दतीने अन्य खात्यात स्थलांतरीत केली. या प्रकरणी संदिपान सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसमधील अज्ञात प्रवाशाच्या विरोधात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या