23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeउस्मानाबादऑनलाईन शिक्षण पध्दतीने शिक्षण झाले सोपे

ऑनलाईन शिक्षण पध्दतीने शिक्षण झाले सोपे

खाजगी अँपचा आधार घेत केले १००% ऑनलाईन यशस्वी व उपस्थिती ही १००% पर्यंत

एकमत ऑनलाईन

अणदूर : जगातील कोणतीही माहिती मिळवणे शक्य झाले ते केवळ इंटरनेटमुळे.संपूर्ण जीवनमान ऑनलाईन झाले आहे म्हंटले तरी काही वावगे ठरणार नाही. मग तो शहरी भाग असो की ग्रामीण. सर्वांनाच आता ऑनलाईन केले आहे.यात अधिकची भर पडली ती कोरोना महामारीमुळे. आज प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाली आहे यात ग्रामीण भागातील काही शाळाही मागे नाहीत. संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार व्हच्र्युअल क्लास रूमव्दारे शिक्षक पध्दतीने आज सर्व ग्रामीण भागात नाव रुपास आलेले तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल हे एक आदर्शवत वेगळा पॅटर्न तयार करतो आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे.

असा असतो दिनक्रम
शासकीय निर्देशानुसार पूर्व प्राथमिक ते दहावी पर्यंतचे नियमित शिक्षण सुरू करून रेग्युलर शिक्षण देणारी ग्रामीण भागातील एकमेव शाळा.यामध्ये नियमित तासिकेचे वेळापत्रक तयार करून वेळ ठरवण्यात आले आहे. ऑनलाईनसाठी लागणारे वार्षिक नियोजन तयार करण्यात आले आहे. प्रत्येक वर्ग आणि विषय व त्यांच्या तासिकामध्ये भाषा, गणित, विज्ञान, व परिसर अभ्यास आदी विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे.मुलांचे मानसशास्त्र लक्षात घेवून तासिकेचा वेळही ३० मिनिटांचा ठेवण्यात आले आहे तर प्रत्येक तासिकेनंतर १० मिनिटांचा वेळ गप्पा मारण्यासाठी व १० मिनिटांचा ब्रेक देण्यात आला आहे.यामुळे मुलांना विश्रांती मिळते व मूड फ्रेश होतो.

आनंददायी शिक्षण
प्रत्येक घर एक शाळा व प्रत्येक शाळा एक घर होईल तेव्हा शिक्षक हे एक बर्डन नसून ते एक माहितीचे माध्यम होईल असे कोण म्हंटले आहे.याचा आधार घेत ऑनलाईन शिक्षण देताना मुलांना अभ्यासाचा कंटाळा वाटणार नाही किंवा त्यांना त्याचे ओझे वाटणार नाही याची काळजी घेत यात घरातील विविध साहित्यांचा आधार घेत शिक्षण दिले जाते. विद्यार्थी आणि शिक्षण यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध या कामी मदतीला येत आहेत. त्यामुळे मुले आनंदाने क्लासला जॉईन होताना दिसून येते. घरातील एक सदस्य या नात्याने आपले शिक्षक राहतात म्हणून विद्यार्थीही त्यांना टीचर ऐवजी ताई व सर ऐवजी दादा या शब्दात बोलतात.अभ्यास हा अभ्यास नसून एक गोष्टीचा भाग तयार होतो व गप्पा मारत अभ्यासक्रम शिकवला जातो.

बालक-पालक-शिक्षक संवाद
विद्यार्थ्यांचा प्रगतीत पालकांचे महत्व कमी समजून चालणे योग्य नाही. कारण या लॉक डाउन काळात मुले ही २४ तास घरी असणार आहेत. त्यामुळे मुलांचे दैनंदिन नित्यक्रम,त्यांच्या आवडी-निवडी,त्यांचे आहार,सवयी याविषयी शिक्षक व पालक यांच्यात नियमित संवाद होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना एकदा घटक किंवा शिक्षकांचे शिकवणे समजले नाही तर याची माहिती पालकांना विचारून त्या वरती मनमोकळेपणाने चर्चा करून उत्तम मार्ग साधले जाते.यामुळे विद्याथ्र्यांना शिक्षण पध्दतीत मदत होऊन शिक्षण अधिक गतीने होत आहे.

विद्यार्थी उपस्थिती लक्षणीय
गुरुकुल मधील मुलाची ऑनलाईन तासाला राहणारी उपस्थिती ही महत्त्वाची बाब आहे कारण अनेक शाळांमध्ये आपण १००% उपस्थिती पाहिली असेल पण इथे मात्र ऑनलाईन क्लासला ही विद्यार्थ्यांचा उपस्थिती ७५% ते १००% दिसून येते यामागे महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना असलेली अभ्यासाची आवड व मागील अनेक वर्षांपासून चालत आलेले अभ्यासातील सातत्य यामुळे हे शक्य आहे.त्यासोबतच नियमितपणे होणारे तास हे ही असु शकते.एखाद्या शिक्षकाची रजा असेल तर त्याचे ऑनलाईन तास इतर शिक्षकांना देऊन त्यात सातत्य ठेवले जाते.या कामी सर्व शिक्षक २४ तास विद्याथ्र्यांना मार्गदर्शन व मदत करतात.

अँपचा आधार
शाळेच्या वतीने प्रभावी असे होम रिवाईझ या नामांकित खाजगी कंपनीचा ई-लर्निंग अँप घेण्यात आला असून या अँपमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम असून तो मुलांच्या मोबाईल व कॉम्प्युटरमध्ये देण्यात आला आहे. मुले आपल्या वेळेनुसार ते पाहून अभ्यास करू शकतात. त्यामुळे आवडीनुसार अभ्यास करताना दिसून येतात.मागील अनेक वर्षाची परंपरा व्हाट्सएपच्या माध्यमातून मागील ५-६ वर्षांपासून मुलांच्या वर्गाचे ग्रुप तयार करून या ग्रुपवरती ऑनलाईन क्लासची लिंक पाठवली जाते.मुले या लिंक वरून क्लास जॉईन करतात.झालेल्या अभ्यास या ग्रुपवरती पाठवतात शिक्षक तो पाहून प्रत्येकांना त्याविषयी वैयक्तिक मार्गदर्शन व चर्चा करतात.

सोने लपवण्याचा धक्कादायक प्रकार तुम्ही पाहिलाय का?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या