36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeउस्मानाबादतुळजाभवानी मंदिर खुले करा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार

तुळजाभवानी मंदिर खुले करा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर बंदमुळे शहराचे अर्थचक्र बिघडले आहे. शहरातील व्यापारी तसेच पुजारी बांधव यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात मंदिर बंद बसल्यामुळे शहरातील आठ ते दहा जणांनी आत्महत्या केली आहे. तर काही छोटो मोठे व्यापारी व्यवसाय बंद करून रोजंदारी करीत आहेत. त्यामुळे मंदिर तात्काळ खुले करावे, अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पुजारी मंडळाने घेतला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिराजवळ देवीच्या मूर्ती आणी पूजा साहित्यचे दुकान चालवून व्यापारी वर्ग कुटुंबाची उपजीविका भागवत होते. मागच्या वर्षी आठ महिने श्री तुळजाभवानी मंदिर बंद असल्यामुळे कुंटूंबाचे आर्थिक चलन बंद झाले. यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. काही दिवस मंदिर खुले केल्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक अडचणी सोडवीत होते मात्र मार्च २०२१ मध्ये कोरोनाचे पेशंट वाढल्यामुळे एप्रिल २०२१ मध्ये शासनाने संपूर्ण मंदिरे बंद करण्याचे आदेश दिले होते. तर काही मंदिर खुले करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर खुले करावे असे व्यापारी, पुजारी वर्गातून मागणी होत आहे.तुळजापूर शहरातील ८० टक्के व्यापारी, पुजारी वर्ग श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर वर अवलंबून आहेत. मुख्यमंत्री यांनी व्यवसाय करून जगू द्यावे, मंदिर उघडण्यास जर उशीर केला तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मागच्या वर्षी तुळजापूर शहरातील आठ ते दहा नागरिकांनी मंदिर बंद असल्यामुळे सर्वच आर्थिक चलन बंद असल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत. येत्या १७ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला वारंवार निवेदन देवून पण दखल घेतली जात नाही. त्यामुळे येत्या मंगळवारी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सर्व आस्थापना चालू केले पण धार्मिकस्थळ बंद ठेवली आहेत. यामुळे येथील पुजारी वर्ग व्यापारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिर न उगडले तर पुढील काळात हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल.
पुजारी मंडळ, उपाध्यक्ष विपीन शिंदे.

तुळजापूर तालुक्याचे आमदार व नगराध्यक्ष हे मंदिराचे विश्वस्त असून मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात स्थानिक पुजारी व व्यापारी हिताचा निर्णय मंदिर संस्थानने घेतलेला नाही. तरी कोरोनाचे नियम पाळून देवि भक्त, स्थानिक व्यापारी व पुजारी यांचा विचार करून मंदिर तात्काळ खुलेकरावे.
अमरराजे कदम, अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ,

श्री तुळजाभवानी मंदिर खुले करून तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून असणारे पुजारी, व व्यापारी वर्गाची प्रशासनाने मंदिर खुले करून पुजारी व व्यापारी वर्गाची उपासमार होत असलेली थांबवावी.
पुजारी मंडळ, अध्यक्ष आनंद कोंडो

मनपाकडे हद्दवाढीचा विकास आराखडा तरी आहे का ?

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या