33.1 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home उस्मानाबाद कृषी विधेयकाबाबत गैरसमज पसरविण्याचा विरोधकांचा डाव : डॉ. अनिल बोंडे

कृषी विधेयकाबाबत गैरसमज पसरविण्याचा विरोधकांचा डाव : डॉ. अनिल बोंडे

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : केंद्र सरकारने कृषी विधेयके ही शेतक-यांच्या हितासाठी केली आहेत. पण विरोधक त्याबाबत शेतकèयांमध्ये गैरसमज पसरवीत आहेत.असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी उस्मानाबाद येथे केले. भाजपा किसान मोर्चा आयोजित शेतकरी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा किसान मोर्चा प्रभारी आ.सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा प्रभारी रमेश पोकळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अ‍ॅड मिलिंद पाटील, अ‍ॅड व्यंकटराव गुंड, सतीश दंडनाईक, किसान मोर्चा सचिव रंगनाथ सोळंके, किसान मोर्चा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बोंडे म्हणाले, सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, राज्य सरकार आणखीही शेतक-यांना मदत करत नाही, पंचनामे न करता कोल्हापूर पुरग्रस्तांसारखी मदत करावी, तसेच कृषी विधेयकाबाबत शेतकरी वर्गात भाजपा कार्यकत्र्यांनी जागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रम पूर्वी मान्यवरांच्या हस्ते ट्रॅकटरचे पूजन करण्यात आले. यावेळी प्र का सदस्य अ‍ॅड अनिल काळे, अविनाश कोळी, नानासाहेब यादव, माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, युवा मोर्चा अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, कृ उ बा समिती सभापती अरुण वीर, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, महिला अध्यक्ष माधुरी गरड, राहुल काकडे, विनायक कुलकर्णी, प्रवीण पाठक, पूजा राठोड, पूजा देडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दात कोरून पोट भरेल?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या