30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत मृत्यूचे तांडव; एकाच ठिकाणी ८ मृतदेहांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार

उस्मानाबादेत मृत्यूचे तांडव; एकाच ठिकाणी ८ मृतदेहांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (सुभाष कदम) : कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यूही ओशाळून जाईल असे भयावह चित्र शनिवारी दि, १० रोजी उस्मानाबाद शहरातील कपिलधार स्मशानभूमित पहायला मिळाले. एकाच दिवशी येथे आठ कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूच्या तांडवाने कपिलधार स्मशानभूमिही गहिवरली असेल म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून उस्मानाबाद शहर व तालुक्यात तर उद्रेक झाला आहे. शनिवारी आलेल्या अवालात जिल्ह्यात तब्बल ५५८ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

उस्मानाबाद जिल्हा वाढत्या कोरोना रुग्णांने हॉटस्पॉट ठरु लागला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अन्य सात तालुक्यात रुग्णसंख्या कमी असून सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद शहर व तालुक्यात आढळून येत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वयंशिस्त पाळली तरच कोरोना उद्रेक कमी होणार आहे. उस्मानाबाद शहरातील जवळपास प्रत्येक गल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील बहुतांश गावात रुग्ण आढळून आल्याने उपविभागीय अधिकाड्ढयांनी ही ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत.

कंटेनमेंट झोन जाहीर केला असला तरी नागरिक मोकाटपणे फिरताना दिसत आहेत. कंटोनमेंट झोनमध्ये नागरिकांना येण्यास व जाण्यास प्रतिबंध करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासुन दररोज ५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असतानाही शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक स्वयंशित्त पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असतानाही रस्त्यावरील गर्दी कमी झालेली नाही. शहरातील गर्दी पुर्वीसारखीच दिसून येत आहे.

नागरिकांच्या गैरवर्तनापुढे आता प्रशासनही हतबल झालेले आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जात असले तरी नागरिक आवाहनाला प्रतिसाद देताना दिसत नाहीत. शुक्रवारी आलेल्या अहवालात ५५८ रुग्णांपैकी उस्मानाबाद तालुक्यातील ३०९, तुळजापूर ४४, उमरगा ४४, लोहारा १६, कळंब ५८, वाशी २१, भूम ३३, तर परंडा ३३ अशी रुग्णसंख्या आहे. शनिवारी ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या नमुण्यापैकी २४ हजार ६२४ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

लातूर शहरातील लाहोटी कंपाऊंडमधील व्ही. के. कलेक्शनला आग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या