30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeउस्मानाबादउस्मानाबाद: पोलीस पाटील यांना ५० लाखाचे विमा कवच द्या

उस्मानाबाद: पोलीस पाटील यांना ५० लाखाचे विमा कवच द्या

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद:  राज्यातील गाव पातळीवर काम करणारे पोलीस पाटील हे गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच कोरोना महामारीचा सामना स्वत:चा जीव धोक्यात घालून करीत आहेत, राज्य सरकारच्या अन्य कर्मचा-याप्रमाणे पोलीस पाटील यांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे क, जागतिक कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर कोरोना सहाय्यता समितीचे गठन करण्यात आले आहे, या समितीचे पोलीस पाटील हे सदस्य सचिव म्हणून काम करीत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना जळगाव जिल्‘ातील व अन्य जिल्‘ातील पोलीस पाटील यांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे, राज्य सरकारने सर्व शासकय, निमशासकय कर्मचा-यांना कोरोना महामारीने मृत्यू झाल्यास ५० लाखाचे विमा संरक्षण दिले आहे, त्या प्रमाणे पोलीस पाटील यांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे, निवेदनावर जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाकुरे-पाटील, अजित शिंदे, तानाजी जाधव, सुनिल अंधारे, यांच्या स‘ा आहेत.याच मागणीचे निवेदन भाजपचे आमदार रानाजगजितसिंह पाटील यांना दिले असून हा विषय गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

उस्मानाबाद: पोलीस पाटील यांना ५० लाखाचे विमा कवच द्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या