उस्मानाबाद : जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून जिल्ह्यातील दुकाने उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा ठरवून दिलेल्या आहेत. मात्र दुकानदारांकडून वेळेचे पालन होत नसल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढत व्यापा-यांना वेळेचे पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसापासून शहरातील दुकाने वेळेवर उघडली व बंद केली जात असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून दररोज २०० ते २५० रुग्ण सापडत आहेत. प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सोशल डिस्टंस पाळणे, दुकानदारांनी भाव फलक दर्शनी भागावर लावणे, दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये म्हणून दुकानासमोर रिंगण तयार करणे बंधनकारक केले आहे. दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
परंतू व्यापारी वेळेचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दोन दिवासापुर्वी रस्त्यावर उतरून वेळेचे बंधन पाळण्याचे आवाहन व्यापाèयांना केले होते. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसापासून शहरातील दुकाने वेळेत उघडली व बंद केली जात आहेत. तहसील कार्यालयाने नगर परिषद, महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा समावेश असलेली पथके चौकाचौकात तैनात केली असून नियम तोडणाèयावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
तोंडाला मास्क न लावणा-यावर ५०० रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यावर २०० रुपये, वेळेच्या नंतर दुकान चालू ठेवल्यास एक हजार रुपये दंड आकारला जात आहे. दंडाच्या भितीपोटी व्यापारी दुकाने बंद करीत आहेत.
जळकोट येथील तहसीलमध्ये अखेर ‘आधार’ची सुविधा