30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबरोबरच लाचखोरीचा उद्रेक

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबरोबरच लाचखोरीचा उद्रेक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असताना प्रशासनातील अधिकारी, कर्मचाèयांचाही लाचखोरीत उद्रेक झाल्याचे पहावयास मिळत आहे. कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील घटनेपाठोपाठ दुस-याच दिवशी शनिवारी (दि.१७) उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी २० हजार रुपये लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात धरले आहे. त्यामुळे कोरोनाने सर्वसामान्य नागरिक तंग असतानादेखील प्रशासनातील मस्तवाल अधिकारी, कर्मचारी लाच घेण्यात दंग आहेत. त्यांना कसलीही सर्वसामान्यांची दया वाटत नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार व त्यांच्या आई आणि दोन भावावर उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक श्रीमती शेख यांच्याकडे होता. पो. उप.नि शेख यांचे मदतनीस पोलीस शिपाई प्रदीप रामभाऊ तोडकरी, यांनी तक्रारदार यांचेकडे तक्रारदार यांच्या आई आणि एक भावास एमसीआर करून बेल मिळवून देण्यास प्रयत्न करणे, तपासात मदत करणे आणि तक्रारदार आणि त्याचा भाऊ यांना गुन्ह्यातून काढून टाकण्यासाठी शनिवारी (दि.१७) पंचांसमक्ष ३० हजार लाचेची मागणी करून तडजोडी अंती २० हजार लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने सापळा लावून रंगेहाथ गजाआड केले. हा सापळा एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अशोक हुलगे यांनी व पो.अंमलदार इफतेकार शेख, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली.

जिल्ह्यात कोरोनाचे महाभयंकर संकट सुरु आहे. यात अनेकांचे बळी जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनता त्रस्त आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हे लाचखोरीत दंग असल्याचे यावरुन दिसून येते. विशेष म्हणजे कळंब येथील घटना आदल्यादिवशी घडली असताना दुस-याच दिवशी या पोलीस कर्मचा-याने लाच घेण्याची हिम्मत केले आहे. त्यामुळे प्रशासनातील लाचखोर अधिकारी, कर्मचारी यांना कारवाईचीही भिती राहीली नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.

महाराष्ट्रातल्या ५० टक्के कोरोना बाधितांमध्ये आढळला भारतीय प्रकारचा विषाणू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या