31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादमहामारीचा प्रकोप डॉक्टरांचे प्रयत्न

महामारीचा प्रकोप डॉक्टरांचे प्रयत्न

एकमत ऑनलाईन

जगावर अनेक संकट आली पण त्याला सर्वांनी तोंड दिले पण जग कधी थांबल नाही, मात्र कोरोणा ने मात्र सगळ बदलून गेलं. नात्यामध्ये ही अंतर पडला.प्रत्येक जण एकमेका कडे संशयाने पाहू लागले, अनोळखी हात अंत्यविधी साठी सरसावले. कधी न घडणारे घडू लागले. कोरोणा झालेल्यांची अवस्था न सांगण्यासारखी झाली.जे बाधित आहेत, ते मात्र काळजी घेण्याचे तळमळीने सांगत आहेत.

मी कोरोना पॉझिटिव्ह आलो. त्यावेळी खुप मनात भिती होती. आणि आज सुध्दा आहे, आता काय होणार कसे होणार, आपण बरे होऊ का नाही असे अनेक प्रश्न मनात वादळ निर्माण करत होते. डॉक्टर मित्र आणि काही निकटवर्तीयांनी या कालावधी मध्ये धिर दिला आणि यातुन मला बाहेर पडण्यास यश मिळाले. मात्र त्या काळात सुध्दा पत्रकारिता चालुच होती. अशी प्रतिक्रिया कोरोना होऊन गेलेल्या शितल कुमार घोंगडे यांनी व्यक्त केली.

कोविड मध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका डॉक्टर बजावत आहेत. कोविड केअर सेंटर मध्ये पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येतो. त्यामुळे त्याची मानसिक काय असते हे अनेकांच्या तोंडून ऐकले होते. काहींचा वाईट तर काqहनी चांगली अनुभव सांगितला होता. त्यामुळे एकदा तरी कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन पॉझिटिव्ह रुग्णांसोबत चर्चा करायची आणि त्यांचा अनुभव ऐकायचा ही मनोमन खुप इच्छा होती. आपण गेलो आणि आपल्याला वापस संसर्ग झाला तर. त्यामुळे काही दिवस टाळाटाळ केली.

सध्या शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील कोविड केअर सेंटर मध्ये खाजगी डॉक्टर सेवा देत आहेत. ते नेमके काय करतात, पॉझिटिव्ह रुग्णांवर व्यवस्थित उपचार सुरू आहेत का? यासह विविध प्रश्नांचे उत्तर शोधायचे आणि काय परिस्थिती आहे हे पहायचे होते. मी डॉ. रमेश जाधवर यांना फोन लावला कोविड केअर सेंटर मध्ये मला यायचे आहे. यावर जाधवर यांनी उगाच रिस्क कशाला घेता, आत्ताच तुम्ही ठिक झाला आहात. असे सांगितले त्यावर मी ऐकायला तयार नसल्यामुळे त्यांनी मला जाऊ या, असे सांगितले. त्या नंतर डॉ अभिजीत जाधवर यांचा फोन आला, आपल्याला कोविड केअर सेंटर वरती जायचे आहे. मी सुरक्षित राहील याची काळजी घेऊन त्यांच्या सोबत निघालो.

मनात भिती तर कायम होती. डॉ. रमेश जाधवर, डॉ. अभिजीत जाधवर, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. शैलेश बिदादा, डॉ. सचिन पवार आणि मी मिळून जाऊ लागलो. जाता जाता तुम्ही येत आहात हे खूप चांगले आहेत. डॉक्टर किती जिव धोक्यात घालून काम करतात हे तुमच्या लक्षात येईल असे डॉ. कुलकर्णी म्हणाले, बोलत बोलत कोविड केअर सेंटर आले. गेट च्या आत प्रवेश केला. मी पॉझिटिव्ह आल्यावर माझी काय परिस्थिती होती. तो क्षण डोळ्यासमोर उभा राहिला आणि शरीराचा थरकाप उडाला. मनाची तयारी करुन आत प्रवेश केला. तर अश्चर्यचकित होणारी गोष्ट पहायला मिळाली. सर्व रुग्ण मनमोकळ्या गप्पा मारत होतो. डॉक्टरांना पाहून सर्वांच्या चेहèयावर हास्य फुलले, डॉक्टरांनी एक एकाला बोलावून तपासणी केली. अनेकजण डॉक्टर मधील देवपण पाहत होते.

तर काही जण तुम्ही आमच्या कुटुंबतील सदस्य आहात असे वाटते आहे म्हणत होते. एक वयोवृद्ध आज्जी ने बाबाओ तुम्हाला आयुष्यभर काहीच होणार नाही बघा, तुमचं भल होत राहील, हा एक आज्जीचा आशिर्वाद आहे. तो क्षण पाहून माझ्या डोळ्यात टचकन अश्रू आले. तर डॉक्टर यांनी आज्जी, काकु, आजोबा, ताई काळजी करु नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमची तब्येत सुधारत आहे. असे सांगून सर्वांचे मनोधैर्य वाढवत होते. हे सर्व पाहून समाधान वाटले डॉक्टरमधील देवपण हे पुन्हा एकदा दिसुन आले.

खरंच कोविड केअर सेंटरमध्ये या प्रमाणे शारीरिक व मानसिक उपचार झाले तर कोरोनाला हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. कोरोणा च्या भीतीने अनेक जण गेले, तर अनेकांना पुनर्जन्म मिळाला. सर्वांची प्रतिकार शक्ती वाढावी व या महामारीतून सर्वजण सुखरूप बाहेर यावेत, हेच आई येदेश्र्वरी देवीला या निमित्त साकडे घातल्याचे शितलकुमार घोंगडे यांनी सांगितले. हा महामारी चा प्रकोप आहे, त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी घेण्याची गरज आहे.

-सतीश टोणगे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या