21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeउस्मानाबादशालेय पोषण आहारात प्लास्टीक सारखा तांदूळ

शालेय पोषण आहारात प्लास्टीक सारखा तांदूळ

एकमत ऑनलाईन

भूम : भूम शहरातील अंगणवाडी, बालवाडी व अन्य शाळेतील विद्याथ्र्यांना वाटप केला जात असलेला तांदूळ प्लास्टिक मिश्रणयुक्त असल्याचे दिसत आहे. याची तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस आदम शेख यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

भूम तालुक्यातील अनेक अंगणवाडी, बालवाडी शाळामधील बालकांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून तांदूळ वाटप केला गेला आहे. यामध्ये प्लॅस्टिकयुक्त तांदूळ वाटप केल्याचे दिसून येत आहे. यामुळे पालकांमध्ये शासन व शिक्षक विरोधी वातावरण निर्माण होत आहे. पालक आक्रमक होत असल्याने तसेच नागरिकांनी संबंधित कर्मचारी यांचेकडे तक्रारी देखील केल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आदम शेख यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी बालकाच्या घरी जाऊन तांदळाची पाहणी केली आहे. त्यामध्ये प्लास्टिकसारखा दिसणारा तांदूळ दिसून आला होता. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असून निवेदनावर आदम शेख, शंकर खामकर यांच्या सह्या आहेत.

विस्तार अधिकारी व्यंकट पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तक्रारी संदर्भात वरीष्ठ यांना कळवले असता फूड कार्पोरेश न ऑफ इंडिया यांच्यामार्फत शासनाला जो पोषण आहार पुरवला जातो त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे की, प्लास्टिक सदृश्य दिसत असलेला तांदूळ हा फोर्टीफाईड केलेला तांदूळ आहे. यामध्ये तांदळावर आयरॉन, फॉलिक एॅसिड, व्हिटॅमिन १२ बी मिश्रण विरघळणारी प्रक्रिया करून तांदळाला कोटींग केली असल्याचे सांगितले. शासनाला शालेय पोषण आहार पुरवठा करणारी एफसीआय ने हा विषय शिक्षक व संबंधितांना अद्याप का सांगितला नाही व लोकांमध्ये संभ्रम का निर्माण केला असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘मांजरा’च्या पाणलोट क्षेत्रात केवळ ६२ मिलीमीटर पाऊस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या