20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home उस्मानाबाद केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रचंड मतभेद आहेत. परंतू कांही ही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वकांही उद्ध्वत झाले आहे, असे असतांनाही मुख्यमंत्री राजकीय भाषा करीत आहेत. काळजीवाहू सरकार असताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकèयांसाठी आपण तातडीने १० हजार कोटीची मदत वाटप केली होती. जर सरकारमध्ये इच्छाशक्ती असेल तर शेतकèयांना मदत करू शकता, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारून महाराष्ट्र राज्य सक्षम व समृध्द राज्य आहे. १० ते २० हजार कोटी उभा करण्यास कांहीच वेळ लागत नाही, परंतू राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपला नाकर्तेपणा दाखवत आहे. सरकारचा हा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर आहे, अशी घणाघाती टिका फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.

उस्मानाबाद जिल्हयातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पहाणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री फडणवीस सोमवार दि. १९ व मंगळवार दि. २० रोजी जिल्हयात होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राणाजगजितqसह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, अ‍ॅड. मिलींद पाटील, अ‍ॅड. खंडेराव चौरे आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी राज्यात अनेक ठिकाणी पिकांसोबत जमिन वाहून गेली आहे. विहिरी गाळाने भरल्या आहेत. तर मोटारी ड्रीप इरीगेशनची यंत्रणा वाहून गेली आहे. फळबांगाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकार ने पिक विका कंपनीवर दबाब आणून शेतकèयांना मदत करण्यास भाग पाडावे लागेल. आपल्या काळात कोल्हापुर-सांगली-साताèयामध्ये महापूर आल्यानंतर अनेक शेतकèयांच्या जमिनी वाहून गेल्या त्यावेळेस हेक्टरी ७० हजार रुपये आपण मदत दिली असल्याचेही सांगितले. ज्यांचे घरे पडली आहेत, त्यांच्यासाठी तात्पुरते घरे उभारावी लागतील.

ठाकरे व पवारांना संधी
मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना अतिवृष्टी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पर हेक्टरी २५ हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी केली होती. तर अजित पवार यांनी १० हजार कोटीची मदत तुटपूंजी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आज शेतकरी प्रचंड संकटात आहे. सर्वकाही वाहून गेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतक-यांसाठी चांगले काम करण्याची संधी आहे, असा टोला ही फडणवीस यांनी लगावला.

केंद्राने २० हजार कोटी दिले
राज्यातील अतिवृष्टीमुळे जे कांही नुकसान झाले, त्याबाबत पंतप्रधान मोंदी यांनी स्वत: संपर्क साधून चौकशी केली आहे. केंद्र सरकारकडून मदत मिळण्यास उशीर होत असला तरी एसडीआरएफ मध्ये केंद्र सरकार ने अ‍ॅडव्हान्समध्ये कांही पैसे जमा केलेले असतात त्याप्रमाणेच मार्च पर्यंत जिसटीची २० हजार कोटीपर्यंतचे अनुदान राज्यांना दिले आहे. कोरोनाची परिस्थिती राज्यात व केंद्रात असतानाही केंद्र सरकार ने १ लाख कोटी रुपये कर्ज काढून १४ टक्के वाढीव रक्कम राज्यांना दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार ने केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याची आवश्यकता नाही, शेतकरी प्रचंड अडचणीत असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी ठाकरे सरकार राजकीय भाषा करून केंद्राकडे बोट दाखवित आहे. शेतकèयांंविषयी ठाकरे सरकार ने संवेदनशीलता दाखवावी, असेही फडणवीस म्हणाले.

रेल्वे कामाबाबत राज्य सरकारचे धोरण बदलले
आमच्या काळात रेल्वे मार्गांचे काम करीत असताना ५० टक्के खर्चांचा वाटा राज्य व केंद्र सरकार समान प्रमाणात वाटून घेत होते. परंतू या ठाकरे सरकारने या धोरणात बदल केला आहे. त्यामुळे रेल्वे बाबतचे अनेक कामे ठप्प झाले आहे, असे फडणवीस यांनी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पवारांच्या काळातील कृषी धोरण
केंद्र सरकार ने नुकतेच जाहीर केलेले कृषी धोरण शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनीच तयार केलेले आहे. याचा उल्लेख त्यांनी आत्मचरित्रात ही केला आहे. जलयुक्त शिवारची चौकशी करून विरोधी पक्षाचे तोंड सरकार बंद करू शकत नाही, राज्यात जलयुक्त शिवारचे ६ लाख कामे झाले आहेत. त्यातुन फक्त ७०० तक्रारी आल्या आहेत. हे प्रमाण फक्त अर्धा टाक्का आहे. कोणत्याही सरकारी कामाच्या ५ ते ७ टक्के तक्रारी येत असतात. परंतू जाणीवपुर्वक हे सरकार जलयुक्त शिवारबाबत गैरसमज पसरवित आहे.

शरद पवारांची भूमिका योग्य
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे केंद्र सरकार ने जीएसटी व इतर करांची राज्याची थकित रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कर्ज काढण्यावरून कांही मतभेद आहेत का ? या संदर्भात विचारले असता पवारांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे सांगून सरकार दरवर्षी ७० ते ८० हजार कोटी रुपये कर्ज काढते व फेडते ही सध्या राज्याची मर्यांदा १ लाख २० हजार कोटी रुपये कर्ज काढण्याची मर्यादा आहे. अत्तापर्यंत सरकार ने ६० हजार कोटी रुपये कर्ज घेतले आहे. त्यामुळे कर्ज काढून राज्य सरकार ने तातडीने मदत करावी, असे मत मांडत फडणवीस यांनी पवारांनी कर्ज काढण्याची घेतलेली भूमिका योग्य असल्याचे सांगितले आहे.

चीनला ४० हजार कोटींचा फटका

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

लॉकडाऊन काळातील कामगारांच्या रकमेवरही दलालांचा दरोडा

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेला तेरणा कारखाना मागील १० वर्षांपासून चक्क बंद आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे....

हजारो करदात्यांकडून पीएम किसान योजनेत कोट्यावधीची लूट

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम ) : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा पात्र नसतानाही हजारो करदात्या शेतकèयांनी कोट्यावधीची लूट केली आहे. या लुटारुमध्ये जिल्ह्यातील नामवंत धनदांडगे डॉक्टर,...

राज्य सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ लागेना

उस्मानाबाद : सध्याचे सरकार शाळा चालु करायच्या का नाही, विज बिले कमी करायचे का नाही, १०० युनिट मोफत द्यायचे का नाही, याबाबत गोंधळलेली आहे....

जिल्ह्यात तीन ठिकाणी घरफोडी; लाखोंचे दागिन्यासह रोकड पळविली

उस्मानाबाद : जिल्ह्यात घरफोडी, लुटालूट, दरोडे, हाणामारी यासारख्या घटना सुरुच आहेत. दिपावलीनिमित्त घरातील नागरिक गावाकडे गेल्याचा फायदा घेवून घरफोडी होत आहेत. उस्मानाबाद शहरातील आदर्शनगर...

जिल्ह्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरु : जिल्हाधिकारी दिवेगावकर

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थी त्यांचे स्वत:चे घरुन येणे-जाणे करतात. अशा शाळांमधील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सोमवारी (दि.२३)...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...